एक्स्प्लोर

कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केला तरूणाच्या खुनाचा उलगडा, मित्रांनीच घात केल्याचे उघड

Jalgaon News Update : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावा लगत 6 जून रोजी  कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Jalgaon News Update : कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात  राहणाऱ्या रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिली होती. त्यावरून तपास कताना रोहित याचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावा लगत 6 जून रोजी  कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.  या ठिकाणी  केवळ सांगाडा शिल्लक असल्याने पहिल्यांदा मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते. 

मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या माध्यमातून पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली  असता भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात  राहणाऱ्या रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसांत दिल्याची माहिती मिळाली. 

या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी रोहित याचे कपडे आणि चप्पलच्या माध्यमातून मृतदेह हा रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं निष्पन्न केले होते. रोहितचां मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडे देखील आढळून आले. त्यामुळे रोहितचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने शवविच्छेदना देखील कारण स्पष्ट होणे कठीण होते. 

मयत रोहित याचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला? या बाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते. 

मित्रांनीच केला खून 
ज्या भागात रोहितचा मृतदेह आढळून आला,  त्या भागात असलेल्या हॉटेलमधील सीसी फुटेजची पोलिसांनी तपासणी केली असता रोहित बेपत्ता झाला, त्या दिवशी त्याच्यासह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुतेजमध्ये आढळून आले. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याच दोन मित्रांनी दोरीने गळा आवळून रोहित याची हत्या केल्याचं कबूल केले. 

 दरम्यान, अद्याप या घटने मागील कारणाचां पोलीस तपास करत आहे. परंतु, प्रेम प्रकरणातून रोहित याचा खून करण्यात आल्याचा अंदाज वर्वला जात आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रोहित याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
कुजलेल्या मृतदेहशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना चोवीस तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने शोध घेणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget