पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, आधी खटके उडाले, वाद टोकाला गेला.. अखेर पतीनं मित्राला चाकूनं भोसकून संपवलं, भंडाऱ्यात खळबळ
काही दिवसांपासून आरोपीला आपल्या पत्नीचे अंकुशसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. (Crime News)

Bhandara Crime: राज्यात गुन्हेगारीने अक्षरश: कळस गाठलाय. मारहाण, किरकाेळ कारणातून हत्या, अत्याचार, लैंगिक संबंधातून खून अशा घटनांनी टोक गाठलंय. पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय मनात घर करून बसल्याने एका तरुणाने थेट आपल्या घनिष्ट मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी गावात घडली. (Bhandara Crime News) संशयातून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, पतीने मित्राला चाकूने सपासप भोसकून जागीच ठार केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंकुश साठवणे (38) असं मृतकाचं नाव असून तो देव्हाडी ग्रामपंचायतीचा सदस्य होता. तर, मुन्ना बिरणवार (32) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, काही दिवसांपासून आरोपीला आपल्या पत्नीचे अंकुशसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. (Crime News)
नक्की प्रकरण काय?
पूर्व वैमनस्यातून भंडाऱ्यात एकानं मित्राची चाकूनं भोकसून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात आज सायंकाळी घडली. अंकुश साठवणे (३८) असं मृतकाचं नाव आहे. मृतक हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. तर, मुन्ना बिरणवार (३२) असं आरोपीचं नावं असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतलं आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. यातूनचं दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृताकाच्या घरी एकत्र आलेत. मात्र, आरोपीनं जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूनं मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली. काकावर चाकुनं हल्ला केल्यानं त्यांना वाचविण्यासाठी मृतकाची पुतणी आकांक्षी धावून आली. यात ती ही जखमी झाल्यानं तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

