एक्स्प्लोर

आता प्रत्येकजण होणार उद्योजक, फक्त 4 टक्क्यांनी मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज, सरकारची 'बीज भांडवल योजना' आहे तरी काय?

राज्य सरकारतर्फे समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. याच योजनांमध्ये बीज भांडवल योजनेचा समावेश होतो.

मुंबई : राज्यातील वंचित घटकाचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सरकारतर्फे योजना राबवल्या जातात. मागासवर्गाने उद्योग विश्वातही भरारी घ्यावी यासाठी सरकारतर्फे बीज भांडवल योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत अर्जदाराला 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते. या योजनेत 10000 रुपयांच्या अनुदानासह 20 टक्के बीज भांडवल सरकारतर्फे उपलब्ध करून दिले जाते. याच पार्श्वभूमीवर सरकारची ही बीज भांडवल योजना काय आहे? हे जाणून घेऊ या...

बीज भांडवल योजना काय आहे?

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये बीज भांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 50,000 ते जास्तीतजास्त रु. 5,00,000/- पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये बँकेचे कर्ज 75% व महामंडळाचे कर्ज 20% तसेच उर्वरित 5% अर्जदाराचा सहभाग असतो.

ही योजना राबविताना लाभार्थ्याकडून वेगवेगळी कागदपत्रे घेतली जातत आणि त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. बँकेकडून अशा प्रकरणांत कर्जमंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत बँकेने एकूण मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेवर 20% इतक्या रकमेचा (रु. 10,000/- अनुदानासहित) धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व त्यानंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरित केले जाते. अशाप्रकारे बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते. 

मंजूर झालेल्या कर्जावर व्याज किती? 

या योजनेअंतर्गत रु. 5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात. महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम (रू.10,000/- अनुदानासह) उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे. उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते. महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर 4% व्याजाचा दर आकारला जातो. वसुलीचा कालावधी पाच वर्षांचा आहे.

योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात?

1) जातीचाजातीचा दाखला

2) उत्पन्नाचा दाखला

3) रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)

4) व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी

5) आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल (रु. 2.00 लाखाच्या वर)

अर्जावर कशी कारवाई केली जाते? 

1) अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.

2) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करुन मान्यता प्रदान केली जाते.

3) जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांची संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयीकृत बँकेकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतात.

4) राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशा प्रकरणांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराकडून महामंडळाचे बीज भांडवल कर्ज वितरणाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे (जसे- जामीनदार, जामिनदाराचे वेतन कपात हमीपत्र-वेतन प्रमाणपत्र, मालमत्ता धारक जामिनदार असल्यास संपत्तीची नोंद असलेले दस्ताऐवज, जामिनदार पडताळणी अहवाल, जामिनदारांचे इलेक्शन कार्ड, विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र तसेच कर्ज वसुलीच्या अनुषंगाने अर्जदाराचा धनादेश इत्यादी) पूर्तता करुन घेतली जाते.

5) अशा मंजूर कर्ज प्रकरणात कर्ज वितरणापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची/जामिनदारांची इत्यादी पूर्तता झाल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज प्रस्ताव वितरणाच्या मंजुरीकरिता प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे सादर केला जातो.

6) प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून कर्ज वितरणाकरिता मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज वितरणाच्या अनुषंगाने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकेच्या नावे बीज भांडवल (कर्ज) व अनुदान अशा दोन रकमांचे दोन स्वतंत्र धनादेश काढून ते बँकेकडे पाठविला जातात.

हेही वाचा :

या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'हे' स्टॉक्स होणार एक्स डिव्हिडेंड!

Mukhyamantri Vayoshree yojna: आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार 3000 रुपये, वयोश्री योजना आहे तरी काय? जाणून घ्या A टू Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special ReportNagpur Clash Ground Report :संचारबंदी हटली, बंदोबस्त कायम; नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट Special ReportRaj Thackeray MNS : जुने भिडू, जबाबदारीचा नवीन ट्रॅक; कशी आहे मनसेची नवीन यंत्रणा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Embed widget