एक्स्प्लोर

Mukhyamantri Vayoshree yojna: आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार 3000 रुपये, वयोश्री योजना आहे तरी काय? जाणून घ्या A टू Z माहिती

Mukhyamantri Vayoshree Yojna: महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांना गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत, त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Mukhyamantri Vayoshree Yojna:  राज्यात समाजकल्याण विभागाची जेष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपयांसह  वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात.

महाराष्ट्रात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३०००रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? सर्व A to Z माहिती वाचा..

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांसाठी तरतूद

महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत, अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात. यात खालील उपकरणांचा समावेश आहे.
चष्मा
ट्रायपॉड
कमरेसंबंधीचा पट्टा
फोल्डिंग वॉकर
ग्रीवा कॉलर
स्टिक व्हीलचेअर
कमोड खुर्ची
गुडघा ब्रेस
श्रवणयंत्र इ.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र?

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
ओळखपत्र
आय प्रमाण पत्र
जात प्रमाणपत्र
स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र
समस्येचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो

इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget