Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
Narayan Vaghul Death : नारायण वाघुल यांचे बँकिग क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन 2009 साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
Narayan Vaghul Death : प्रख्यात बँकर आणि ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल (Narayan Vaghul) यांचे निधन झाले आहे. 88 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. नारायणन वाघुल यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी 12:38 वाजता त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. नारायणन वाघुल यांना आयसीआयसीआय बँकेतील अनेक मोठ्या बदलांचे श्रेय जाते. 1985 मध्ये त्यांनी ICICI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आयसीआयसीआय बँकेला सार्वजनिक वित्तीय संस्थेतून देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या यादीत नेण्यासाठी वाघुल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून ICICI ला 1994 मध्ये बँकेचा दर्जा मिळाला.
सन 1996 मध्ये नारायण वाघुल हे आयसीआयसीआय बोर्डमधून बाजूला झाले आणि 2009 पर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्षपदावर राहिले.
केंद्र सरकारने वाघुल यांना 2009 साली व्यापार आणि उद्योग श्रेणीतील देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले. वाघुल हे बँक ऑफ इंडियाचे सर्वात तरुण अध्यक्षही होते. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांना BOI चे अध्यक्ष बनवण्यात आले.
गेल्या वर्षी त्यांच्या 'रिफ्लेक्शन्स' या पुस्तकाचे प्रकाशन
गेल्या वर्षी नारायण वाघुल यांच्या 'रिफ्लेक्शन्स' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्यावेळी बँकिंग क्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते.
नारायण वाघुल यांचा बँकिंग क्षेत्रातला मोठा अभ्यास होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटमध्ये त्यांनी अध्ययानाचं कामही केलं आहे. तसेच त्यांनी सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून देखील काम केलं.
ही बातमी वाचा :