Petrol And Diesel Price Today : इंधनाचा भाव वाढला की कमी झाला, वाचा तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचा दर काय?
सध्या लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहणार की वाढणार, असे विचारले जात आहे. जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय.
Petrol-Diesel Price Today: सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा दर हा 83-84 डॉलर्स प्रति बॅरल होताच. जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किमतीचा पेट्रोल-डिझेल अशा इंधनांच्या दरावर परिणाम पडतो. सध्या देशात निवडणुकीचेही वातावरण आहे. त्यामुळेदेखील सध्या इंधनांच्या दरात फारसा फरक पडताना दिसत नाहीये. दरम्यान तेल कंपन्यांनी 27 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर झाले होते कमी
भारत सरकारने 15 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते. या दोन्ही इंधनांचा दर दोन रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आला होता. लोकसभा निवडणूक लक्षात घेता, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. सध्या देशात लोकसभेची निवडणूक चालू आहे. त्यामुळे ही निवडणूक संपेपर्यंत इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही.
संकेतस्थळावर पाहता येतील पेट्रोल, डिझेलचे दर
भारतात ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवात. 22 मे 2022 पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्या त्यांच्या संकेतस्थळावर इंधनाचे दर रोज प्रकाशित करतात. त्यामुळे घरी बसून आपण आपल्या शहरातील, देशातील कोणत्याही भागातील इंधनाचे दर जाणून घेऊ शकतो.
घरबसल्या जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
तुम्ही अगदी सहजपणे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. तुमच्या शहरात इंधनाचे दर काय आहेत, हेदेखील लगेच समजू शखते. त्यासाठी तुम्हाला ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या संकेतस्थळावर जाऊन एक एसएमएस पाठवावा लागेल. तुम्ही इंडियन ऑईल या कंपनीचे ग्राहक असाल तर RSP या शब्दासह तुमच्या शहराचा कोड 9224992249 या नंबरवर तसेच BPCL कंपनीकडून पेट्रोल, डिझेल खरेदी करत असाल तर RSP लिहून 9223112222 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवायचा. त्यानंतर तुम्हाला लगेच मेसेजवर तुमच्या शहरातील इंधनाचे दर समजतील.
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली- 94.72 87.62
मुंबई - 104.21 92.15
कोलकाता- 103.94 90.76
चेन्नई- 100.75 92.32
बंगळुरू- 99.84 85.93
लखनौ- 94.65 87.76
नोएडा- 94.83 87.96
गुरुग्राम- 95.19 88.05
चंडीगड- 94.24 82.40
पटणा- 105.18 92.04
हेही वाचा :
पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!
गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!