पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!
रिलायन्स इंडिस्ट्रीजचे अनेक व्यवसाय आहेत. निखील मेसवानी यांच्यावर या उद्योग समूहात मोठी जबाबदारी आहे. त्यांना तब्बल 24 कोटी रुपये पगार मिळतो.
मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे एकूण संपत्ती 9 लाख 63 हजार 725 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. रिलायन्स इंडस्ट्रिजचे (आरआयएल) अध्यक्ष आहेत. या उद्योग समूहाची बाजार भांडवल 19 लाख 74 हजार 000 रुपयांपेक्षा अधिक असते. रिलायन्स इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. अंबानी कुटुंबातील सदस्य या कंपन्यांचा कारभार सांभाळतात. नीता अंबानी, इशा अंबानी, आकाष अंबानी, अनंत अंबानी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अशी एक व्यक्ती आहे, जिला मुकेश अंबानी 24 कोटी रुपये पगार देतात.
मुकेश अंबानींनी घेतले रसिकभाई यांच्याकडून धडे
निखिल मेसवानी हे मुकेश अंबानी यांचे सहकारी आहेत. अंबानी त्यांना तब्बल 24 कोटी रुपये पगार देतात. मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीत सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती आहेत. अंबानी परिवारातील सदस्यांनाही मेसवानी यांच्यापेक्षा कमी वेतन आहे. ते रसिकभाई मेसवानी यांचे पुत्र आहेत. रसिकभाई मेसवानी यांच्याच मार्गदर्शनात मुकेश अंबनी यांनी उद्योगधंद्यांचे धडे घेतलेले आहेत. मुकेश अंबानी यांचे वडील धिरुभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स ग्रुपची प्रगती होत असताना रसिकभाई मेसवानी यांनी मुकेश अंबीनी यांना मार्गदर्शन केलेले आहे.
निखील मेसवानी रिलायन्स इंडस्ट्रीशी कसे जोडले गेले?
रसिकभाई मेसवानी हे धिरुभाई अंबानी यांचे भाचे होते. ते रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. मुकेश अंबांनी यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रिसकभाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. सध्या रसिकभाई यांचे पुत्र निखिल मेसवानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सर्वाधिक वेतन मिळते. सुरुवातीला निखिल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम केले. त्यांच्यावर प्रामुख्याने पेट्रोकेमिकल विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात रिलायन्स इंडस्ट्री पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीत जागतिक पातळीवर मोठं नाव म्हणून नावारुपाला आली आहे. 1986 साली त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत काम करायला सुरुवात केली होती.
दरम्यान, निखील मेसवानी हे फक्त पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीजशीच संबंधित नाहीत. रिलायन्स उद्योग समूहात त्यांच्याकडे अन्य जबाबदाऱ्याही आहेत. आयपीएलची टीम मुंबई इंडियन्समध्येही ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
हेही वाचा :
गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!
आधी गृहिणी आता चालवते तब्बल 800 कोटींची कंपनी, धोनीची सासू शीला सिंह करते तरी काय?