Isha Ambani Welcome Twins: मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म
ईशानं (Isha Ambani) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
![Isha Ambani Welcome Twins: मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म Isha Ambani Anand Piramal Welcome Twins Baby Girl Named Aadiya Baby Boy Named Krishna Isha Ambani Welcome Twins: मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/20/0bf2ea1eba7451ba9cd8a208585d1f971668941760265259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Isha Ambani Welcome Twins: रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीच्या (Isha Ambani) घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. ईशानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल (Piramal) कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
ईशान आणि आनंद पिरामल यांना ट्विन्स झाल्यानं आता सोशल मीडियावर (Social Media) अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. ईशा आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचं नाव कृष्णा असं ठेवलं आहे तर मुलीचं नाव त्यांनी आदिया ठेवलं आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबानं ही बातमी दिली आहे.
2018 मध्ये ईशा आणि आनंदनं बांधली लग्नगाठ
12 डिसेंबर 2018 रोजी हेल्थकेअर बिझनेस ग्रुप पिरामलचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत ईशानं लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.
Mukesh and Nita Ambani's daughter Isha and her husband Anand Piramal were blessed with twins on 19th November, says the family.
— ANI (@ANI) November 20, 2022
(file photo) pic.twitter.com/VXHM4Zhvgc
ईशाचे शिक्षण
ईशा अंबानीचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. ईशानं अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तसेच तिनं स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया येथून बिझनेस एमबीएचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या 23 व्या वर्षी ईशाने वडील मुकेश अंबानी यांना व्यावसायात मदत करण्यास सुरुवात केली.
ईशा रिलायन्स रिटेलचा व्यवसाय हाताळते, ती त्याची अध्यक्ष आहे. मुकेश अंबानी आता तीन लहान मुलांचे आजी-आजोबा झाले आहेत. 10 डिसेंबर 2020 रोजी आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांनी पृथ्वी या मुलाला जन्म दिला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)