करप्रणालीत बदल करता येतो का? आयटीआर भरताना हे शक्य आहे का? जाणून घ्या...
आयटीआर भरण्याची शेवटची तारीखी 31 जुलै आहे. या मुदतीनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी दंड द्यावा लागेल. अशा स्थितीत अनेकजण करप्रणालीत बदल करणे शक्य आहे का? असे विचारतात.
मुंबई : आयटीआर दाखल करण्याच शेवटची तारीख 31 जुलै आहे. 31 जुलैनंतर आयटीआर भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दंड द्यावा लागेल. आयटीआर भरण्याची शेवटची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पण प्राप्तिकर विभागाने ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आयटीआर भरताना अनेकांना करप्रणालीत बदल करायचा असतो. काही करदात्यांना जुन्या करप्रणालीत नव्या करप्रणालीत समाविष्ट व्हायचं असतं तर काही करदात्यांना नव्या करप्रणालीतून जुन्या करप्रणालीत जायचं असतं, त्यामुळे आयटीआर दाखल करताना हा बदल करणं शक्य असतं का, हे जाणून घेऊ या..
'या' लोकांना करप्रणालीत करता येतो बदल
ज्या लोकांचा व्यवसाय, उद्योग हा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत नाही नाही असे लोक दर वर्षी जुन्या करप्रणालीतून नव्या करप्रणालीत बदल करू शकतात. आयटीआऱ दाखल करताना हा ऑप्शन निवडता येतो. अशा स्थितीत प्रत्येक वर्षाला तुम्हाला करप्रणालीत बदल करता येतो. त्यासाठी एकमेव अट म्हणजे तुम्हाला मुदतीच्या आत आयटीआर दाखल करावा लागेल.
'या' लोकांना फक्त एकदाच करता येतो बदल
व्यवसाय, उद्योग हा अर्थिक स्त्रोत असणाऱ्यांना फक्त एकदाच करप्रणालीत बदल करता येतो. अशा व्यक्तींना गेल्या आर्थिक वर्षात निवडलेल्या करप्रमाणीनुसारच आगामी आर्थिक वर्षात आयटीआर दाखल करावा लागतो. उद्योजक किंवा व्यावसायिकांना प्राप्तिकर कायद्याच्या अधिनियम 139 (1) अंतर्गत आयुष्यभरात फक्त एकदाच करप्रणालीत बदल करता येतो. त्यासाठी आयटीआर दाखल करण्याच्या मुदतीच्या आत Form 10IE च्या मदतीने एक अर्ज करून हा बदल करता येतो. त्यानंतर मात्र संबंधित करदाता आपल्या करप्रणालीत कधीच बदल करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्ही सध्या ज्या करप्रणालीच्या पदतीन आयटीआर भरत आहात, तो आयुष्यात फक्त एकदाच बदलता येतो. नवी करप्रणाली ही अधिक सोपी आहे. ज्या पगारदार करदात्यांचे 80 सी अंतर्गत डिडक्शन्स होतात त्यांना नवी करप्रणाली अधिक फायदेशीर ठरते.
जुन्या करप्रणालीचा नेमका काय फायदा?
गृहकर्ज किंवा होम रेंट अलाऊन्स म्हणजेच एचआरएवर इंटरेस्ट यासारख्या डिडक्शन्सना पात्र असलेल्या करदात्यांना जुन्या करप्रणालीनुसार आयटीआर भरणे फायदेशीर ठरू शकते. करदाता काम करत असेलल्या कंपनीने निवडलेली करप्रणाली अंतिम नसते. आयटीआर फाईल करताना यात बदल करता येतो. जुन्या करप्रणालीनुसार कर दाखल करण्याचा पर्याय निवडल्यास तुम्ही 12 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर सूट मिळवू शकता.
(टीप- वर दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. प्रत्यक्ष आयटीआर भरताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
ऑगस्ट महिन्यात 'हे' स्टॉक सुस्साट धावणार, जाणून घ्या नेमकं कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी!
एलआयसीचा 'हा' प्लॅन घ्या अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा, फक्त एकदाच भरावा लागणार प्रिमियम, वाचा सविस्तर!
ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!