एक्स्प्लोर

परदेशात शिक्षण घेण्यासाठी पैसे हवेत? कोणत्याही हमीशिवाय 'ही' बँक देते 50 लाख रुपयांचं कर्ज  

जर तुमचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असेल आणि पैशांची अडचण असेल तर काळजी करण्याचं कोणतही कारण नाही. कारण, तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते.

Educational Loan : जर तुमचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असेल आणि पैशांची अडचण असेल तर काळजी करण्याचं कोणतही कारण नाही. कारण, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय 50 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज देत आहे.  याशिवाय तुम्ही या बँकेकडून 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. SBI ग्लोबल एड-व्हँटेजद्वारे परदेशी संस्थांमध्ये अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत आहे.

कोणत्याही हमीशीवाय शैक्षणिक कर्जाचा पुरवठा

बहुतेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर करायचे असते, परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसमोरील सर्वात मोठे आव्हान असते ते पैशाचे. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. भारतातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला कोणत्याही हमीशीवाय शैक्षणिक कर्ज देत आहे. बँकेच्या या ऑफरमुळे तुम्ही सहज परदेशात शिक्षण घेऊ शकाल. यामुळं पालकांचीही पैशाच्या समस्यांपासून सुटका होते. ते मुलांच्या फीबाबत निश्चित राहतात.

3 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते

SBI विद्यार्थ्यांना हमीशिवाय कर्ज देत आहे. या कर्जामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च भागवता येतो. यामध्ये ट्यूशन फी, पुस्तके, संगणक, वसतिगृहाचे शुल्क आणि अभ्यासाशी संबंधित इतर खर्च समाविष्ट आहेत. हमीशिवाय शैक्षणिक कर्जाबद्दल काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एसबीआय एज्युकेशन लोन कसे मिळवायचे आणि त्यासाठी काय प्रक्रिया आहे असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर, बँकांकडून हमीशिवाय तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे घेऊ शकता याबाबतची माहिती पाहुयात. 

शैक्षणिक कर्जानवर किती व्याजदर?

स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जावर 11.15 टक्के दराने व्याज आकारते. त्याच वेळी, SBI स्कॉलर लोन योजनेअंतर्गत, बँक IIT आणि इतर संस्थांना 8.05 टक्के ते 9.65 टक्के दराने कर्ज देते. SBI ग्लोबल एड-व्हँटेज अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 7.5 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान 10.15 टक्के व्याजदर भरावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.

हमीशिवाय कर्जाचा पुरवठा 

स्टेट बँक ऑफ इंडिया निवडक संस्थांकडून कोणत्याही हमीशिवाय रु. 50 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देते.

परतफेडीचा कालावधी

बँक तुम्हाला शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी वेळ देते. तुम्ही 15 वर्षांसाठी EMI द्वारे कर्जाची परतफेड करू शकता.

कर्जाची रक्कम 

या अंतर्गत तुम्ही 50 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

वितरण कालावधी

फॉर्म I-20 किंवा व्हिसा प्राप्त करण्यापूर्वी कर्ज मंजूर केले जाईल.

कर सूट

विद्यार्थ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 (E) अंतर्गत अभ्यास कर्जावर सूट मिळते, जे उच्च शिक्षणासाठी मिळवलेल्या शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर वजावट प्रदान करते.

कोणत्या देशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळणार? 

युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, हाँगकाँग, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडममधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये किंवा संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक कर्ज देते.

बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बजेट ठरवावे लागेल. तुम्हाला कोणत्या देशातील कोणत्या विद्यापीठात शिक्षण घ्यायचे आहे? शिक्षणासाठी किती खर्च येईल मग शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्ही बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे अर्ज करू शकता. शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थी दोन प्रकारे अर्ज करू शकतात. सर्वप्रथम, तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन देखील कर्जासाठी अर्ज करू शकता. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, बँक तुम्हाला कर्ज मंजूर करेल आणि वितरित करेल.

ही महत्त्वाची कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार

ओळख प्रमाणपत्र
पत्ता पुरावा
शैक्षणिक दस्तऐवज
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक तपशील
फोटो
पॅन कार्ड
व्हिसा दस्तऐवजीकरण
प्रमाणित चाचणी गुण
इंग्रजी प्रवीणता चाचणी गुण
उद्देशाचे विधान (SOP)
रेझ्युमे/सीव्ही

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 06 January 2025Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Embed widget