Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Bank Holiday List : ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. यामध्ये शारदीय नवरात्रीपासून दसरा आणि दिवाळीपर्यंतच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
Bank Holiday List : सप्टेंबर महिना संपत आला आहे. फक्त पाच दिवस बाकी राहिले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरु होणार आहे. या ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. यामध्ये शारदीय नवरात्रीपासून दसरा आणि दिवाळीपर्यंतच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळं या काळात जर तुमची बँकांच्या संदर्भात काही कामं असतील तर ती सुट्टांची यादी बघूनच बँकेत जावं लागेल. अन्यथा अचणींचा सामना करावा लागेल.
सणांमुळे अनेक दिवस बँकाना सुट्ट्या असणार
ऑक्टोबर 2024 मध्ये सणांमुळे अनेक दिवस बँकाना सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये शारदीय नवरात्रीपासून दसरा आणि दिवाळीपर्यंतच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. तुम्हालाही ऑक्टोबरमध्ये बँकांशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर येथील सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडा. दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये बँकांना 31 दिवसांपैकी 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त विविध सणांच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळे ऑक्टोबरमध्ये बँक एक दिवस बंद राहणार आहे. त्याचबरोबर गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, काटीबिहू आणि दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या असतील.
या दिवशी बँका राहणार बंद
1 ऑक्टोबर 2024- विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
3 ऑक्टोबर 2024- जयपूरमध्ये नवरात्रीच्या स्थापनेमुळे बँकांना सुट्टी असेल.
6 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.
10 ऑक्टोबर 2024- अगरतला, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद
11 ऑक्टोबर 2024- अगरतला, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची येथील बँकांमध्ये दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमी मुळे शिलाँगला सुट्टी असेल.
12 ऑक्टोबर 2024- दसरा, विजयादशमी, दुर्गापूजेमुळे देशभरात बँका जवळपास बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
14 ऑक्टोबर 2024- गंगटोकमध्ये दुर्गा पूजा किंवा दसेनच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल.
16 ऑक्टोबर 2024- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अगरतला आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.
17 ऑक्टोबर 2024- महर्षि वाल्मिकी आणि कांति बिहू निमित्त बेंगळुरू आणि गुवाहाटी येथील बँकांना सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2024- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
31 ऑक्टोबर 2024- दिवाळीमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
महत्वाच्या बातम्या:
सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)