एक्स्प्लोर

कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचं मोठं नुकसान, अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल

सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क घटवण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळं शेतकरी आणि व्यापारी यांचं अतोनात नुकसान झाल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit Nawale) केलीय.

Ajit Nawale on Onion Export Duty: केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Export Duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit Nawale) टीका केलीय. कारण, सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क घटवण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळं शेतकरी आणि व्यापारी यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मागील निवडणुकांमध्ये सरकारला कांद्याच्या मुद्यामुळं तोटा झाला होता. त्यामुळं आता कांदा निर्यात धोरणामुळं तोटा होवू नये यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याच अजित नवले म्हणाले.

कांद्याच्या धोरणाबाबत दिरंगाई, शेतमालावर कोणतेही बंधने टाकू नये

दरम्यान, सरकारनं कांद्याच्या धोरणाबाबत दिरंगाई न करता शेतमालाला कोणतेही बंधने टाकू नये असे अजित नवले म्हणाले. विशेषत : कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय यापुढे घ्यावा असे अजित नवले म्हणाले. आगामी काळात शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केलीय.

सरकारने शेतीसंदर्भात घेललले निर्णय?

1) खाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते, त्यावर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर कस्टम शुल्क १२.५०% वरून ३२.५०% करण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतलेला आहे.

2) कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल.

3) बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे.

कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

दरम्यान, कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क ऐवजी 20 टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढली आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते. विशेषत: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत 58 रुपये प्रतिकिलो आहे. तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर 80 रुपये प्रति किलो आहे. अशा स्थितीत सरकारच्या या निर्णयाचा कांद्याच्या दरावरही परिणाम होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
.

कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
चीनच्या बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया'ची क्रेझ, अमेरिकेला झटका देत चीन ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, निर्यातीत मोठी वाढ
Gold Silver Price Today: 10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget