Hasta Resha: तळहातावरील 'अशी' रेषा, जी तुमची प्रेमकहाणी अपूर्ण दर्शविते? काय म्हणते तुमची लग्न, प्रेम रेषा? जाणून घ्या..
Hasta Resha: तुमच्या तळहातावरील एक खास रेषा पाहून, तुम्ही प्रेम आणि वैवाहिक जीवनात किती भाग्यवान आहात हे समजू शकते. हातावरील कोणत्या रेषा लग्नाशी संबंधित आहेत? जाणून घ्या..

Hasta Resha: ते म्हणतात ना, हात आणि कपाळावर लिहलेलं भाग्य कधीच पुसलं जात नाही. कितीही अडचणी असो, जे तुमच्या नशीबात लिहिले आहे, ते योग्य वेळ आली की तुम्हाला मिळणारच.. तुमच्या वैवाहिक किंवा प्रेमाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचा आवडता जोडीदार जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे जगतो, तेव्हा संघर्षाने भरलेले जीवन थोडे सोपे वाटू लागते. सुखी वैवाहिक जीवनामुळे माणसाच्या अनेक समस्या सुलभ होतात. याचे कारण म्हणजे जोडीदारासोबत भावनिक आधार असतो, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहातावर विवाह रेषा असतात ज्यांच्याशी तुमचे वैवाहिक जीवन जोडलेले असते. तुमच्या तळहातावरील ही खास रेषा पाहून तुम्ही प्रेम आणि वैवाहिक जीवनात किती भाग्यवान आहात हे कळू शकते. जाणून घेऊया हातावरील कोणत्या रेषा लग्नाशी संबंधित गोष्टी सांगतात?
तळहातात लग्न आणि प्रेम रेषा कुठे आहे?
हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळीच्या खाली दिसणाऱ्या रेषांना प्रेम रेषा किंवा विवाह रेषा म्हणतात. हाताच्या सर्वात लहान बोटाला करंगळी म्हणतात. या बोटावरील रेषा तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगतात. कधीकधी यावर एकापेक्षा जास्त प्रेमाच्या रेषा असतात. या बोटावर अनेक प्रेम रेषा किंवा विवाह रेषा असू शकतात, ज्या प्रेम प्रकरण किंवा वैवाहिक जीवन दर्शवतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, तुमच्या हातावरील रेषा तुमच्या लव्ह लाईफबद्दल बरेच काही सांगू शकतात. जर तुमच्याकडे मंगळ आणि बुधाच्या पर्वतावर अनेक रेषा असतील तर तुमच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात आणि विभक्त देखील होऊ शकतात. अशी रेषा असेल तर ती व्यक्ती नेहमी प्रेमसंबंधात संघर्ष करत असते आणि शेवटी त्याची प्रेमकहाणी अपूर्णच राहते.
...तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहते
हस्तरेषा शास्त्रानुसार लग्न रेषा सूर्य रेषेला स्पर्श करत असेल तर तुमचे नाते श्रीमंत कुटुंबात असेल. त्याच वेळी, दोन भागांमध्ये विभागलेली विवाह रेषा घटस्फोट दर्शवते. जर विवाह रेषा सूर्य रेषेला स्पर्श करत असेल तर अशी व्यक्ती श्रीमंत आणि संपन्न कुटुंबातील असते. याशिवाय दोन भागांमध्ये विभागलेली विवाहरेषा विवाह मोडण्याचे संकेत देते.
जर तुमच्या तळहातातील विवाह रेषा तुटलेली असेल तर...
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर तुमच्या तळहातातील विवाह रेषा तुटलेली असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधात अनेक चढ-उतार दिसतील. अनेक वेळा तुटलेल्या रेषेमुळे माणसाचे प्रेमसंबंधही तुटतात. याउलट, जर विवाह रेषा स्वच्छ आणि खोल असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल.
हेही वाचा>>>
Hindu Religion: तुमच्या शरीरावरील 'एक' तीळ मालामाल करु शकतो! पैशांसाठी कोणता तीळ भाग्यशाली मानला जातो? समुद्रशास्त्रात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
