Garud Puran: महिलांना मासिक पाळी म्हणजे पापांचे भोग? गरुड पुराणात याबद्दल काय म्हटलंय? जाणून घ्या..
Garud Puran: अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की, मासिक पाळीचा त्रास फक्त आपल्यालाच का? याचे उत्तर गरुड पुराणात दिलेले आहे
Garud Puran: एकीकडे मासिक पाळीला निसर्गाचे वरदान समजले जाते, तर दुसरीकडे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासातून दर महिन्याला जावे लागते. अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की, हे फक्त आपल्याच बाबतीत का घडतं? याचे उत्तर गरुड पुराणात दिलेले आहे. गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी इंद्रदेवाच्या पापांचे भोग भोगतात. असं काय घडलं? की फक्त महिलांनाच मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो, जाणून घ्या गरुड पुराणात मासिक पाळीबद्दल काय सांगितले आहे...
महिलांना मासिक पाळी म्हणजे पापांचे भोग? गरुड पुराणात म्हटलंय...
पौराणिक कथेनुसार, इंद्रदेवाने गुरूच्या वेशात आलेल्या एका राक्षसाचा वध केला होता, त्यानंतर त्याच्या वाट्याला गुरूच्या हत्येचे पाप आले. ते पाप कमी करण्यासाठी नद्या, पृथ्वी, झाडं आणि स्त्रिया अशी विभागणी केली. ज्यानंतर ते पाप स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या स्वरूपात आले असे म्हटले जाते.
अशा लोकांना पापाचे भागीदार व्हावे लागते
गरुड पुराणानुसार, जो व्यक्ती गर्भवती स्त्री किंवा मासिक पाळीने पीडित स्त्रीचा अपमान करतो आणि तिच्याशी गैरवर्तन करतो, अशा लोकांना पापाचे भागीदार व्हावे लागते. याशिवाय मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला आधीच अनेक समस्या आणि वेदनांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पतीने पत्नीशी संभोग केल्यास ते महापाप मानले जाते आणि नरक यातना भोगाव्या लागतात.
मासिक पाळी काळात महिलांना स्पर्श करण्यासही बंदी?
मासिक पाळीच्या काळात अजूनही काही ठिकाणी महिलांना अस्पृश्य मानले जाते आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या दरम्यान, महिला कोणतेही काम करत नाही आणि घराबाहेर पडत नाही. पूर्वीच्या काळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जायची. या काळात त्यांना स्पर्श करण्यासही बंदी होती. महिलांना सातव्या दिवसापर्यंत कोणतेही दैवी किंवा पितृकार्य करण्यास मनाई आहे. पण चौथ्या दिवसापासून ते आंघोळ वगैरे नंतर स्वयंपाकघर हाताळू शकतात आणि इतरांना स्पर्श करणे योग्य मानले जाते. पण आता बदलत्या काळानुसार या गोष्टी बदलत चालल्या आहेत.
काय आहे गरुड पुराण?
गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे, प्राचीन भारतीय ग्रंथांची एक शैली जी विश्वविज्ञान, पौराणिक कथा, नीतिशास्त्र, विधी आणि इतर अनेक विषयांवर विस्तृत सांगण्यात मदत करते. हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणातही आढळते. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात. हिंदू धर्मात मृत्यूनंतर हे श्रावण करण्याची तरतूद आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की, माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ मिळते, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळते. त्यामुळे कर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीला गरुड पुराण सांगितल्याने त्याला जन्म-मृत्यूशी संबंधित सर्व सत्याचे ज्ञान होते.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )