Astrology : 'या' राशींच्या मुलींमध्ये जन्मत:च असते लीडरशिप क्वालिटी; प्रत्येक क्षेत्रात असतो यांचा दबदबा, कधीच मानत नाहीत हार
Astrology : जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या तिथी आणि वेळेनुसार त्याची रास काढली जाते. या राशींनुसार व्यक्तींचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व ओळखण्यास मदत होते.

Astrology : ज्योतिष शास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या राशींवर (Zodiac Signs) कोणत्या ना कोणत्या ग्रहाची छाप असते. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या तिथी आणि वेळेनुसार त्याची रास काढली जाते. या राशींनुसार व्यक्तींचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व ओळखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, आज आपण अशाच काही 3 राशींच्या मुलींबद्दल (Girls) जाणून घेणार आहोत ज्यांच्या जन्मत:च लीडरशिप क्वालिटी असते.
'या' राशींच्या मुलींमध्ये असते नेतृत्वक्षमता
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह हा साहस, नेतृत्वाचा प्रतीक मानला जातो. मंगळ ग्रहाचे हे गुण या राशीच्या मुलींमध्ये देखील आढळतात. या मुली कधीच आपला शब्द मागे घेत नाहीत. तसेच, जे बोलतात ते त्या करुन दाखवतात. यांच्या चेहऱ्यावर तजेलदार व्यक्तिमत्व दिसून येतं.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह हा साहस अणि नेतृत्वाचा कारक ग्रह आहे. त्यामुळेच वृश्चिक राशीच्या मुलींमध्ये जन्मत:च साहसी वृत्ती असते. या राशीच्या मुली फार आत्मविश्वासू आणि निर्भीड असते. यांना चॅलेंज स्विकारायला आवडते. तसेच, या राशीच्या मुली आव्हानांचा देखील साहसाने सामना करतात. या मुली मल्टी टॅलेंटेड असतात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या स्वामी ग्रह हा सूर्य देव आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्याचे नेतृत्व गुण ज्या राशींच्या मुलींमध्ये असतात. त्या मुली फार हुशार आणि चाणाक्ष असतात. त्यांचं सगळ्या गोष्टींवर लक्ष असतं. तसेच, सिंहाप्रमाणेच त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी दिसून येते. यांचं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित असतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला जुळून येणार 'चतुर्ग्रही योग'; 'या' 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, हातात चुंबकासारखा येणार पैसा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

