Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला जुळून येणार 'चतुर्ग्रही योग'; 'या' 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, हातात चुंबकासारखा येणार पैसा
Mahashivratri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य, तसेच, चंद्र, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आणि न्यायदेवता शनी हे चारही ग्रह या दरम्यान एकाच राशीत संक्रमण करणार आहे.

Mahashivratri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) उत्सव यंदा कुंभ राशीत होणार आहे. यामुळे दुर्लभ ग्रह संयोग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य, तसेच, चंद्र, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आणि न्यायदेवता शनी हे चारही ग्रह या दरम्यान एकाच राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे पाच राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
ग्रहांच्या या विशेष संयोगाने मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगलं प्रमोशन मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी या चार ग्रहांचा संयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. विवाहाशी संबंधित तुमच्या अडचणी दूर होतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. जर तुम्ही कुठे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभ काळ असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. या काळात भावा-बहिणींबरोबर तुमचे चांगले संबंध राहतील. तसेच, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ मिळेल. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
चतुर्ग्रही योगाच्या संयोगाने या राशीच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. या काळात अनावश्यक पैसे खर्च करु नका. तसेच, वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उच्च अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील. मुलांची देखील अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Surya Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचा कुंभ राशीत अस्त, 'या' 3 राशींच्या वाढणार अडचणी; एकामागोमाग वाढतील संकटं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

