Astrology : आज बुधादित्य, रवि योगासह बनले मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार
Panchang 03 February 2025 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी बुधादित्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 03 February 2025 : आज, म्हणजेच 3 फेब्रुवारीला अनेक शुभ संयोग घडत आहेत. आज षष्ठी तिथीचा योग आहे. आजचा आठवड्याचा पहिला दिवस अनेक राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आज अनेक शुभ योग देखील तयार होत आहेत. सूर्य आणि बुधाची युती येऊन बुधादित्य योग तयार होत आहे, त्यासोबतच आज रवि योग देखील जुळून आला आहे. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप चांगला असेल. आज तुमच्यावर कामाचा ताण असेल, तरीही तुम्ही प्रत्येक परिस्थिती उत्साहाने हाताळू शकाल. आज तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. तुमचं सरकारी क्षेत्रातील कामही आज यशस्वी होईल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्यांना आज यश मिळेल आणि आजारी व्यक्तींची प्रकृती सुधारेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. आज तुमच्या नशिबामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त फळ मिळेल. कामावर आज तुमची प्रशंसाही होईल. आज मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. मेक-अप वस्तूंचा व्यवसाय करणारे आज चांगले उत्पन्न मिळवू शकतील. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठीही आजचा दिवस शुभ राहील. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला आज मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मदतीचा फायदा होऊ शकतो.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा असेल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातही यश मिळेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकतं. शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणूक करणं सुरक्षित आणि फायदेशीर असेल. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

