Horoscope Today 03 February 2025 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 03 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आज अमावस्येचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 03 February 2025 : आज अमावस्येचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी खुशखबर ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तसेच, आज दूरचे नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. कुटुंबात ऐज आनंदी वातावरण पाहायला मिळेल. भविष्याची चिंता जाणवणार नाही. तसेच, आरोग्य देखील उत्तम असेल.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. वातावरणातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार जाणवू शकतो. तसेच, आज तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात थोडाफार अडथळा येऊ शकतात. त्यामुळे आजच्या दिवसात कोणतीच महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. तसेच, इतरांवरही अवलंबून राहू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. ज्यामुळे तुम्ही फार निराश व्हाल. त्याचा तुमच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व आज चांगलं उठून दिसेल. आज तुम्ही तुम्ही कुटुंबियांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनदेखील करु शकता. आज विनाकारण कोणाशी वाद घालू नका.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील मतभेद सोडविण्याचा प्रयत्न कराल. तसेच, कुटुंबाच्या सुखासाठी प्रयत्न करताना दिसाल. आज कामाच्या बाबतीत तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकतं. तसेच, हिवाळ्यात सांधेदुखीचे आजार उद्भवतील.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावाचा असणार आहे. आज तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण करु शकणार नाहीत. त्यामुळे तुमची सतत चिडचिड होईल. पण, तुम्हाला मेहनतीला पर्याय नाही. मुलांच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ झालेली दिसून येईल. तसेच, तुमच्यात आज भरपूर आत्मविश्वास असेल. एखादं काम तुम्ही अगदी सहजतेने पूर्ण करु शकाल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज भासणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांचा चांगला लाभ मिळेल. आज तुम्ही पोटाशी संबंधित आजाराशी त्रस्त असू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, वाहनांचा प्रयोग करताना तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. मित्रांचा सहवास तुम्हाला लाभेल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या संदर्भा अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारी योजनांचा देखील तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुमचं भविष्य उज्ज्वल कसं करता येईल याचा प्रयत्न करा. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमचे विनाकारण पैसे खर्च होऊ शकतात. अशा वेळी पैशांचा जरा जपून वापर करा. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक समस्या जाणवू शकतात. तसेच, व्यवसायात देखील लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. फक्त तुम्हाला कामाचा ताण जाणवेल.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, भावा-बहिणींच्या नात्यात रुसवे-फुगवे होतील. नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला दबदबा पाहायला मिळेल. समाजात मान-सन्मान चांगला मिळेल. नवीन काहीतरी करण्याची तुमची इच्छा जागृत होईल.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. त्याचा तुम्हालाही आनंद होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा करु नये. तसेच, शारीरिक स्वास्थ्यासाठी नियमित योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















