Agriculture News : मका, मोहरी आणि मूग या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्या, कृषी आयुक्त, ए के सिंह यांचे आवाहन
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खाद्यतेलामध्ये देश स्वयंपूर्ण होण्यासाठी मका, मोहरी आणि मूग यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत कृषी आयुक्त, ए के सिंह यांनी व्यक्त केले.
Agriculture News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खाद्यतेलामध्ये देश स्वयंपूर्ण होण्यासाठी मका, मोहरी आणि मूग यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) उपमहासंचालक आणि कृषी आयुक्त, ए के सिंह (A.K.Singh, Deputy Director General) यांनी व्यक्त केले. तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. मका, मोहरी आणि मूग या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खाद्यतेलामध्ये देश स्वयंपूर्ण होईल अशी माहितीही सिंग यांनी दिली.
कृषी-रासायनिक फर्म धानुका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मुख्य खरीप पिकांच्या संरक्षणातील आव्हाने' या विषयावरील संवादात सिंह बोलत होते. पीक वैविध्यतेला मोठ्या प्रमाणात चालना दिली पाहिजे. गहू आणि तांदूळ यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, 3Ms मका, मूग आणि मोहरीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण यामुळे देशाला स्वयंपूर्णता प्राप्त होण्यास मदत होईल. त्यामुळं शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदतही होईल असे सिंह यांनी सांगितले. भारत कडधान्य देखील आयात करतो. यावेळी बोलताना सिंह यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या गरजेवरही भर दिला. कृषी संशोधन संस्थांना लवकरात लवकर ड्रोनच्या वापरासाठी प्रोटोकॉल विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांसाठी आगाऊ आकस्मिक योजना असणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकरी ते स्वीकारु शकतील. 33 कृषी विद्यालय केंद्र (KVK) मधील अनेक प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ, तसेच ICAR मधील शास्त्रज्ञ, या सल्लागार बैठकीत सहभागी झाले होते. यामध्ये धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील खेळाडू आणि शेतकरी यांचाही सहभाग होता. दरम्यान, 'एकात्मिक पीक व्यवस्थापन' पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दर्जेदार कृषी निविष्ठा स्वीकारण्याच्या गरजेवर धानुका ग्रुपचे चेअरमन आर जी अग्रवाल यांनी भर दिला. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या धर्तीवर, आम्ही एक सराव म्हणून 'एकात्मिक पीक व्यवस्थापन' स्वीकारण्याचा विचार करू शकतो. यामुळं देशभरात लागवड केलेल्या विविध पिकांशी संबंधित गंभीर समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. म्हणूनच कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दुर्दैवाने, कृषी-रसायन क्षेत्रासह भारतातील कृषी-निविष्टांच्या बाजारात काही ठिकाणी फसवणूक होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी, निकृष्ट कृषी-निविष्टांच्या धोक्याला प्राधान्याने सामोरे जाणं अत्यावश्यक असल्याचे अग्रवाल म्हणाले. खासगी क्षेत्राच्या सहकार्याने प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील सल्लागार बैठक आयोजित केली जात आहे. या बैठकीच्या शिफारशींमुळे शेतकऱ्यांना किटक आणि विविध पीक रोगांच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल असे मत ICAR-कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक राजबीर सिंह यांनी व्यक्त केले. पर्यायी पिकं घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं शेतकरी समुदायालाही मोठी मदत होईल असे सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: