एक्स्प्लोर

Agriculture News : सिमला मिरची उत्पादक शेतकरी ब्लॅक थ्रीप्स किडीमुळे अडचणीत, उत्पादनात 70 टक्के घट येण्याची शक्यता

Agriculture News : सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

Agriculture News : ढोबळी मिरचीवर (Capsicum) 'ब्लॅक थ्रीप्स' (Black Thrips) या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कलर कॅप्सिकम आणि कॅप्सिकम उत्पादक (Capsicum) अर्थात सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

ढोबळी मिरची उत्पादनात प्रचंड घट

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये तसंच राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फूलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव 'थ्रीप्स पार्विस्पिनस' (Thrips parvispinus) असे आहे. फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे. ही प्रजाती भारतामध्ये 2015 मध्ये प्रथम पपई या पिकावर आणि त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती. मिरची, ढोबळी मिरची, पपई, वांगी, बटाटे आणि फूलपिके यावर या फूलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची फळे खराब होतात. उत्पादनात प्रचंड घट येते. ब्लॅक थ्रीप्समुळे ढोबळी मिरची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी मिरचीची पिके काढून फेकत आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मिरची उत्पादनात प्रचंड अशी घट झाली आहे. एकरी दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खर्च केला असला तरी त्यांच्या हाती तितकेही उत्पादन येणार नसल्याची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

प्रादुर्भावाची लक्षणे आणि नुकसान 

  • फूलकीड आकाराने लहान असून, पानाखाली आणि पानावर राहते. ती डोळ्यांना सहज दिसू शकते. ती कळ्या, फुलांमध्ये दिसून येत असल्यामुळे तिला 'फ्लॉवर थ्रीप्स' किंवा रंगाने काळी असल्यामुळे 'ब्लॅक थ्रीप्स' या नावानेही संबोधले जाते.
  • प्रौढ किडींपेक्षा लहान किडे जास्त नुकसान करतात.
  • या किडीच्या प्रार्दुभावामुळे पानांच्या कडावरील बाजूस वळतात. पानामध्ये खोलगट भाग तयार होतो.
  • या किडीमुळे पानांचा देठ लांबणे, पाने वाळणे, फुले गळणे इ. लक्षणे पिकांमध्ये दिसून येतात.
  • मिरची फळावर ओरखडल्यामुळे डाग पडतात. फळांची प्रत खालावते.
  • फूलकिड्यामुळे मिरची पिकाचे सुमारे 30 ते 70 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहे

मिरची पिकावर दरवर्षी नवनवीन रोग येत असतात. मिरची पिकावरील रोगांवर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र असे मिरची संशोधन केंद्र उभारण्यात यावी आणि नवनवीन संशोधन करुन विषाणूजन्य आणि कीडजन्य रोगांवर उपाययोजनांसाठी संशोधन झाल्यास त्यातूनच राज्यातील मिरचीच्या शेत्र वाढीला जालना मिळेल हे मात्र निश्चित.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Nagpur News : बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यांवर कारवाई होणार, मोठ्या संकटात सापडणार? फडणवीसांच्या जवळच्या आमदाराचं वक्तव्य
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Video : न्यायमूर्तींच्या बंगल्यातील स्टोअर रुममध्ये पाचशेच्या नोटांच्या पोत्यांची थप्पी जळत असताना 65 सेकंदाचा अनकट Video; अग्नीशमन कर्मचारी म्हणाला, महात्मा गांधींमध्ये आग लागली!
Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Embed widget