Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळवले जाणार असून उद्या अर्थात 1 जुलैपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
![Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार IND vs ENG Jasprit bumrah to lead Team India in fifth Test Match against England rishabh pant vice-captain Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/f19cda397f1d89cc2cbf53f56eba5dcd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs ENG : भारत (Indian Team) आणि इंग्लंड (England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलैपासून बर्मिंगहमच्या मैदानात सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वीच रोहित शर्माला कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्याकडे सोपवली आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन ही पोस्ट शेअर केली आहे.
कसा आहे भारतीय संघ:
मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
उद्यापासून रंगणार कसोटी सामना
मागील वेळी भारतीय संघाला 5 सामन्यांच्या कसोची मालिकेतील अखेरचा सामना कोरोनाच्या संकटामुळे खेळता आला नव्हता. हाच सामना या दौऱ्यात खेळवला जाणार आहे. 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात हा एकमेव कसोटी सामना पार पडल्यावर पुढील सामने खालीलप्रमाणे होतील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)