Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?
Virat Kohli : विराट कोहलाने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर नुकतेच तीन फोटो शेअर केले होते. या फोटोंना रिट्वीट करत इंग्लंडच्या फोटोग्राफरनं आभार मानले आहेत.
English Photographer to Virat Kohli : जॉन मालेट नावाच्या एका इंग्लंडच्या फोटोग्राफरनं (English Photographer) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार मानले आहेत. विराटने त्याच्या ट्वीटरवर इंग्लंड दौऱ्यातील वॉर्मअप सामन्यातील काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो जॉन यानेच काढले असल्याने त्याने काढलेले फोटो विराटने स्वत:च्या अकाऊंटवर पोस्ट केल्याने जॉनने विराटचे आभार मानले आहेत. जॉनने विराटने शेअर केलेले फोटोज रिट्वीट करत त्याचे आभार मानले त्याने लिहिलं की, 'मी खूप आभारी आहे, की जगातील एका महान खेळाडूने मी काढलेले फोटोज आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले. हे फोटोज मला काढायला मिळाणं हे माझं सौभाग्य आहे. विराट कोहलीसह बीसीसीआयचेही धन्यवाद'
वॉर्म-अप सामन्यात कोहलीचं अर्धशतक
लीसेस्टरशायमरविरुद्ध भारताने खेळलेल्या वॉर्म-अप सामन्यात विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने एक दमदार अर्धशतक ठोकत 33 चेंतडू 67 रन केले. हा सामना अनिर्णीत सुटला. विराटसह केएस भरत, रवींद्र जाडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनीही वॉर्म-अप सामन्यात चांगल प्रदर्शन केलं.
कसं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक?
1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडल्यावर पुढील सामने खालीलप्रमाणे होतील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना