IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' पाच फलंदाजांवर सर्वांची नजर, एकट्याच्या जीवावर जिंकवू शकतात सामना
IND vs PAK : रविवारी अर्थात 4 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामना रंगणार आहे.
![IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' पाच फलंदाजांवर सर्वांची नजर, एकट्याच्या जीवावर जिंकवू शकतात सामना In India vs Pakistan Super 4 asia cup 2022 match 5 batsmans evryone have eyes on IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' पाच फलंदाजांवर सर्वांची नजर, एकट्याच्या जीवावर जिंकवू शकतात सामना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/10e3db1ab240e32368d1fc0753ca72881662109650181224_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs PAK Super 4: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना उद्या अर्थात 4 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2022) हा सामना सुपर 4 फेरीमधील असून दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंची फौज असली तरी काही महत्त्वाच्या खेळाडूंवर खासकरुन फलंदाजांवर क्रिकेट चाहत्यांची नजर असेल. यामध्ये जर फलंदजांचा विचार केला तर पुढील पाच खेळाडू उत्तम कामगिरी करु शकतात...
रोहित शर्मा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध आपल्या बॅटने विरोधी संघाच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवू शकतो. जगातील एक धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने आतापर्यंत भारतासाठी 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 4 शतके झळकावली आहेत. मात्र, आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट काही खास कामगिरी करू शकलेली नाही. पण त्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड दमदार असल्याने तो आता पाकिस्तानविरुद्ध सामन्यात मोठी खेळी करु शकेल, अशी सर्वच क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
केएल राहुल
भारतीय टीम संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल दुखापतीनंतर पुन्हा भारतीय संघात परतला आहे. अजूनपर्यंत त्याने खास कामगिरी केली नसली तरी तो एक उत्तम दर्जाचा खेळाडू असल्याने त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो स्फोटक फलंदाजी करण्याची दाट आशा आहे. विशेष म्हणजे केएल राहुल असा फलंदाज आहे, की त्याच्या खेळीवर तो संघाला सामना जिंकवून देऊ शकतो.
विराट कोहली
आशिया कप 2022 मधील सामन्यांतून पुन्हा एकदा शानदार फॉर्ममध्ये येऊ लागला आहे. त्याने पहिल्या सामन्यात 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर हाँगकाँगविरुद्धतर त्याने अप्रतिम अर्धशतक झळकावलं. 58 धावांच्या त्याच्या खेळीने संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. विशेष म्हणजे कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 77.75 च्या सरासरीने 346 रन बनवले. या दरम्यान त्याने तीन अर्धशतकं झळकावली असल्याने यंदाही तो धमाकेदार कामगिरी नक्कीच करु शकतो.
बाबर आझम
टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची दहशत सर्वांनाच माहित आहे. तो सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. मात्र, बाबर आझम आशिया कपमध्ये खास कामगिरी करु शकला नाही. भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला. अशा स्थितीतही तो पुन्हा चांगल्या फॉर्मात परतू शकतो. त्यामुळे बाबर भारतीय संघाविरुद्ध त्याच्या जुन्या लयीत फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे.
फखर जमान
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा अनुभवी स्फोटक फलंदाज फखर जमान भारताविरुद्ध फारशी खास कामगिरी करू शकला नाही. मात्र, त्याने हाँगकाँगविरुद्ध शानदार पुनरागमन करत अर्धशतक झळकावलं. अशा स्थितीत तो आपला तोच फॉर्म कायम ठेवू शकत असल्याने रविवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करु शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)