Alandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली
Alandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. वारी का करावी ? वारीची महती काय ? यासंदर्भात माहिती देतायत पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज बघुया.
आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे (Dnyaneshwar Maharaj Palkhi) पंढरपूच्या (Pandharpur) दिशेनं प्रस्थान होणार आहे. यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची (Warkari) मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंद्रायणीचा (Indrayani) काठ वाऱ्यकऱ्यांनी फुलला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात वारकरी तल्लीनं झाल्याचं चित्र आज आळंदीत पाहायला मिळत आहे. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पालखीचे प्रस्थान झाले आहे.
इंद्रायणीच्या घाटावर मोठ्या उत्साहच वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचे निमित्ताने तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.