Ghatkopar Hoarding Accident : होर्डिग कोसळण्याला केवळ भिंडे जबाबदार? अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईला आता दररोज कोर्टात कुणी ना कुणीतरी आव्हान देत असल्याचं दिसतंय. भिवंडीतील भल्या मोठ्या चार होर्डिंग्जला एमएमआरडीएनं पाठवलेल्या नोटिशीला कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं गेलंय. हे होर्डिंग्ज काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी सक्त ताकदी या नोटीसद्वारे देण्यात आली आहे. या नोटीसला याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही नोटीस बेकायदा असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या याचिकेवर उत्तर देण्यास वेळ द्यावा, अशी विनंती एमएमआरडीएच्यावतीनं खंडपीठाकडे केली गेली. जी मान्य करत हायकोर्टानं यावर सोमवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलंय.





















