Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha
मुंबई,पुणे, गोव्यासह देशभरातील विविध शहारात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, फटक्यांची आतषबाजी आणि केक कापून केलं नव वर्षाचं वेलकम.
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, सरत्या वर्षाला गूड बाय करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात मुंबईकरांची गर्दी.
वांद्रे रिक्लेमेशन परिसरामध्ये नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी, जल्लोषात केलं नव वर्षाचं स्वागत.
मुंबईतील अंधेरीच्या कंट्री क्लबमध्ये नववर्षाचं उत्साहात स्वागत, सेलिब्रेशनसाठी कलाकार सोनाली झा आणि एजाज खान देखील उपस्थित.
पुणेकरांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत, पुणेकरांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजी.
रायगडच्या कर्जतमध्ये शेती पर्यटनातून तयार केलेल्या फार्महाऊसना पर्यटकांची पसंती, पर्यटकांकडून नववर्षाचं आनंदात स्वागत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून २०२४ वर्षातील आठवणींना उजाळा देणारी खास पोस्ट शेअर,२०२४ मध्ये जणतेनं भरभरून प्रेम दिलं, आता २०२५ मध्ये आणखी जोमानं काम करू, फडणवीसांची एक्स पोस्ट.