Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद
Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद
नाशिकमध्ये दाखल होताच राज ठाकरे नी आढावा घायला सुरवात केली पक्षातील निवडक कार्यकर्ते पदाधिकारीशी चर्चा सुरू कार्यकर्त्यांशी 1 to1 चर्चा करणार पक्षातील काही नाराज, जुन्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेणार संघटनेत काही बदल होणार का?
हे ही वाचा..
शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यानंतर पवार कुटुंबात दुरावा वाढल्याचे दिसून आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे दिसून आले. मात्र, मागील महिन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच गुरुवारी (दि. 23) पुण्यातील एका कार्यक्रमात काका-पुतणे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार हे आज गुरुवारी (दि. 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुटूंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटते. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येणे अवघड आहे. एका पक्षाला विचार सोडावे लागतील तर दोन्ही पक्ष एकत्र होतील. पवार साहेब एक विचार घेऊन पुढे जात आहेत. पण अजित दादा आणि शरद पवार दोन्ही मोठे नेते आहेत, ते याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.