Rain Superfast : : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 2 PM : 24 जुलै 2024: ABP Majha :
Rain Superfast : : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 2 PM : 24 जुलै 2024: ABP Majha :
महाराष्ट्राच्या बहुतांश (Maharashtra Rain) भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड (Mumbai Rain Update) या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण स्टेशनजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर गुडघाभर पाणी साचलंय. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलाय. या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे . गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालाय.