Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी येथे एका शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.. वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोरांच्या या मृत्यूने खळबळ उडाली आहे.. एच१एन१ या विषाणमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भात शासनाकडून ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.. अशातच पाच मोरांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.. शनिवारी काही तरुणांना शेतात मोर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी आले. वन विभागाच्या चमूने घटनास्थळी पोहोचून त्याठिकाणीच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करत अंत्यसंस्कार केले.. या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळे ही होऊ शकतो अशी शक्यता ही वर्तवण्यात येत aah.. मृत पक्षांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील न्यायवैद्याक प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील संस्थेला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे..