Microsoft Server Outage | जगभरात मोठं सायबर संकट, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड
Microsoft Server Outage | जगभरात मोठं सायबर संकट, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड
हे देखील वाचा
Vishalgad Fort: विशाळगड कुणाचा? खरी हकीकत काय? विश्वास पाटलांनी ब्रिटीश पुरावे मांडले!
कोल्हापूर: काही दिवसांपूर्वी विशाळगडाच्या परिसरात हिंसक जमावाने केलेल्या तोडफोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. विशाळगडावरील (vishalgad fort) अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, जमावाने केलेल्या हिंसाचारामुळे या मुद्द्याला वेगळेच वळण लागले होते. या सगळ्यावरुन वाद सुरु असताना इतिहासकार विश्वास पाटील (Vishwas patil) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विशाळगडाचा इतिहास सांगितला आहे. त्यांच्या या पोस्टमधून विशाळगडाचा इतिहास, दर्गा आणि इतर मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गावे बांधायला आणि समाजाची उभारणी करायला अनेक पिढ्यांना अनेक शतके खर्ची घालावी लागतात. ती जाळायला फारसा वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागत नाही, असे मत विश्वास पाटील यांनी या पोस्टमधून व्यक्त केले आहे.
विश्वास पाटलांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
विशाळगडावरचा बाबा कोण ? तो दर्गा कोणाचा ? रेहानचा की मलिक उतगुजारचा ? खरी हकीगत काय? ब्रिटिश कागदपत्रातले पुरावे!
1886 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये पान क्रमांक 322 वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर 17 फूट लांब, पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता. त्याची देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पाउंड म्हणजेच त्यावेळीच्या दरानुसार 90 रुपयेचा खर्च केला जात असे. हा दर्गा हजरत मलिक रेहान पीर यांचा आहे. तिथे दरसाल उरुस भरतो. त्या उरसाला 300 ते 400 भाविक हजर असतात. या जागृत ठिकाणाला मुसलमान तसेच हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत.