Mallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगे
इंडिया आघाडीचं सरकार आल्यास खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यासाठी 20 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील (Mumbai) सहा जागांसह, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. राम मंदिरांबाबत(Ram Mandir) मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलं.