Buldhana Crime News : वसतीगृह अधिक्षकाकडून 12 वर्षीय मुलावर अत्याचार, बुलढाणा येथिल घटना
Buldhana Crime News : वसतीगृह अधिक्षकाकडून 12 वर्षीय मुलावर अत्याचार, बुलढाणा येथिल घटना
चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर वस्तीग्रह आहे. हे वसतिगृह शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येत. मात्र याच वस्तीगृहात विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे दिसून आल आहे.. अशाच प्रकारचा अत्याचार या नराधम अधीक्षकाने इतर अनेक मुलांवर केल्याचे बोलल्या जात आहे. यावर पोलीस तपास करत आहेत. मात्र ज्यावेळी "एबीपी माझा" या वस्तीगृहावर पोहोचला त्यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थी वाऱ्यावर होते. वस्तीगृहात कुणीही सुरक्षारक्षक नव्हत . त्यामुळे आता शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या झालेल्या प्रकारामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे या वस्तीगृहातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी..