(Source: Poll of Polls)
Ahmednagar Lok Sabha 2024 : Nilesh Lanke भाजपचं गणित बिघडवणार? महायुतीच्या विरोधात कोण?
अहमदनगर जिल्हा म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेला जिल्हा. मात्र, या जिल्ह्याचे राजकारण नावाप्रमाणे इतकं साधं नाही…..ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा एकेकाळी कम्युनिष्टांचा गड समजला जायचा. आता हा जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो…..या जिल्ह्याने महाराष्ट्राला सहकार दिला आणि याच सहकाराला जोडून आलेलं राजकारण देखील.अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात घराण्याचं मोठं नावं आहे. या दोन घराण्याबरोबरच काळे, कोल्हे, राजळे, गडाख, तनपुरे, घुले, पाचपुते असे साखर सम्राट असलेले राजकारणी आहेत. मात्र, या साखर सम्राटातील बहुतेक घराणे विखे अथवा थोरात गटाशी विभागले गेलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण या दोन्ही घराण्याभोवती फिरत असते.
अहमदनगरच्या राजकारणात पक्ष कधीच महत्वाचा नव्हता. नात्याचे राजकारण आणि पाडापाडीचे राजकारण हे या जिल्ह्यातील राजकारणाचं वैशिष्ट. अहमदनगर जिल्हा दक्षिण आणि उत्तर अशा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या जिल्ह्यात काय हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार? कोण शर्यतीत आहे.? मतदार राजा कोणाला साथ देणार? याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत….