एक्स्प्लोर

नागपूर बुलडोझर कारवाईला कोर्टाचा 'ब्रेक'; पोलिसांकडून अटक सत्र सुरूच,  सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर आणखी  तिघांना बेड्या 

Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीय.

Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील (Nagpur Violance) कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फूटप्रिंटसच्या आधारे नागपूर पोलिसांनी (Nagpur City Police) नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 113 वर पोहोचली आहे. 

फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव, हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं

नागपूर शहरातील (Nagpur) हिंसाचार घटनेतील कथित मास्टर माईंड फहीम खान यांच्या घरावरही महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. यात महापालिकेनं नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधताना फहीम खानने (Fahim Khan) काही भागात अतिक्रमण केलं होतं. यासंदर्भात नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला ही सुरुवात केली होती. मात्र, नागपूर (Nagpur) पालिकेच्या कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात (Highcourt) धाव घेतली. त्यावर, तत्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच, अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन महापालिकेकडून होत असल्याचा दावा हायकोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला होता. दुसरीकडे नागपूर पोलिसांनी मात्र घटनेतील आरोपींवर कारवाईचे सत्र सुरुचे ठेवले आहे. 

 सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर अटक सत्र सुरूच! 

पुढे आलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शारिक रजा, मोमीन मोहम्मद फिरोज खान आणि शोएब मोहम्मद बेग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हिंसाचार घडला त्या दिवशी रात्रीचे विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर सध्या नागपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. आणि त्या आधारावरच पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या एकूण आरोपींपैकी आतापर्यंत 36 आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर एकूण 113 आरोपींपैकी 12 आरोपी अल्पवयीन म्हणजेच विधी संघर्ष बालक असल्याने त्यांच्या विरोधात त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 April 2026: आज शुक्रवार दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
आज शुक्रवार दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने अचानक धनलाभ, आजचे राशीभविष्य
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget