Google Doodle: जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गूगलचं डूडल; पाहा काय आहे खास?
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त (Earth Day 2023) गूगलनं खास डूडल (Google Doodle) केलं आहे.
Earth Day 2023: आज गूगलनं जागतिक वसुंधरा दिनानिमित्त (Earth Day 2023) खास डूडल (Google Doodle) केलं आहे. या गूगल डूडलच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जागतिक वसुंधरा दिन हा आज (22 एप्रिल) जगभरात साजरा केला जात आहे. हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. आपण सर्वजण मिळून हवामान बदलाचा (Climate Change) वाढता प्रकोप छोट्या प्रयत्नांनी कसा रोखू शकतो? याबाबत गूगलनं हे खास डूडल बनवून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गूगलनं केलेल्या या डूडलचं डिझाईन खास आहे. यामध्ये विविध प्राणी दिसत आहेत.
गूगलचा खास संदेश
गूगलनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर डूडलचं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यामतून गूगलनं जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या ट्वीटमध्ये एका ब्लॉगची लिंक देखील शेअर करण्यात आली आहे. ही लिंक ओपन केल्यावर तुम्हाला गूगलचा जागतिक वसुंधरा दिनाचा ब्लॉग दिसेल. यामध्ये लिहिलं आहे की, प्रत्येकजण आपल्या दैनंदिन कामात बदल करून हवामानात होणाऱ्या बदलाला (climate change) रोखू शकतो. उदाहरणार्थ, कपडे सुकविण्यासाठी ड्रायर न वापरता मोकळ्या हवेत कपडे वाळवत टाकणे, बाईक किंवा इतर कोणतेही वाहन वापरण्याऐवजी वॉकिंग करणे.
Today’s #GoogleDoodle celebrates 🌏 Day
— Google Doodles (@GoogleDoodles) April 22, 2023
Individuals & communities can work together to take action against climate change. Learn more about how to get involved in Earth-saving activities → https://t.co/EFsRnNX9f8 pic.twitter.com/DgmPJo6dS4
जागतिक वसुंधरा दिनाची थीम (World Earth Day Theme 2023)
यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट' "Invest in Our Planet."अशी आहे. या थीमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे पृथ्वीसाठी धैर्याने कार्य करणे, कामात नाविन्य आणणे आणि समानतेने काम करणे असे आहे. याआधी 2022 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा'.
झाडे लावणे, रस्त्यालगतचा कचरा उचलणे, लोकांना शाश्वत जीवन जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. याशिवाय शाळा आणि विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या:
World Earth Day 2023 : 'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो? वाचा इतिहास आणि महत्त्व