एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक 2016साठी खास पदकं

मुंबई: नेल्सन नेटो कार्नेरो या शिल्पकारानं रिओ ऑलिम्पिकच्या पदकाचं डिझाईन तयार केलं आहे. सोन्यापेक्षाही बहुमोल असं, हे ऑलिम्पिक पदक बनवताना कला आणि शास्त्राचा संगम साधण्यात आलाय. शिल्पकार आणि मशिन ऑपरेटर यांच्यासह 100 जणांच्या पथकानं पाच हजारांहूनही अधिक पदकं तयार केली आहेत.
नेल्सन कार्नेरो यांनी दोन आठवडे अहोरात्र मेहनत करून चक्क हातानं पदकांचा साचा घडवला. 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकपासून पदकाच्या एका बाजूला ग्रीक देवता नाईकी दाखवण्यात येत आहे. पण यंदा कॉर्नेरियो यांनी ही देवता रेखाटताना ती एखाद्या ब्राझिलियन तरुणीसारखी वाटावी, म्हणून काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पदकावरील तरुणीच्या मागच्या बाजूला पँथिऑन मंदिर दाखवणयात आलं आहे. तर पदकाच्या दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिकचा लोगो आणि लॉरेलचं पान दाखवलं आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकात 494 ग्रॅम चांदी आणि सहा ग्रॅम सोनं आहे. या पदकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदाच्या पदकांचं वजन 20 टक्के जास्त आहे. सध्या सोन्याचा भाव हा सुमारे 31 हजार रुपये तोळा एवढा आहे, पण रिओ ऑलिम्पिकच्या एका सुवर्णपदकाची किंमत ही जवळपास 40 हजार रुपये इतकी आहे.
या सर्व पदकांमध्ये चांदीचं प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश चांदी ही जुने आरसे आणि एक्स-रे प्लेट्सचा पुनर्वापर करून मिळवण्यात आलीय.
ज्या रिबिन्समुळं ही पदकं खेळाडूंच्या गळ्यात शोभून दिसतात, त्या रिबिन्सही जुन्या प्लास्टिकच्या बॉटल्सचा पुर्नवापर करून बनवण्यात आल्या आहेत. जितकी मेहनेत हे पदक गळ्यात घालून घेण्यासाठी खेळाडू करतात. तितकीच मेहनत ते पदक तयार करण्यासाठी या अवलियाने घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
