संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची उपस्थिती, आरोपींना VC द्वारे हजर केले जाणार?
Santosh Deshmukh Case: बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर पहिल्या वेळेसच सुनावणी बीडला होत आहे.

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) सुनावणी होणार आहे. दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर पहिल्या वेळेसच सुनावणी बीडला होत आहे. या आधी केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत ही एक सुनावणी झाली होती. मात्र आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हे हजर राहणार आहेत. तर आज ओळख परेड होण्याची शक्यता आहे.
सुनावणी अगोदर सर्व तपासी अधिकाऱ्यांशी उज्वल निकम यांची चर्चा
आशातच, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीचे खंडणी प्रकरणातील तपास अधिकारी अनिल गुजर हे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भेटीला आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होत असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी चर्चा करण्याकरिता सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर बीडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आहे. सीआयडीचे आयपीएस डॉ.बसवराज तेली हे देखील यावेळी उपस्थित आहे. सीआयडी आणि एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भेटीला आले असून या प्रकरणाच्या तपासाची माहिती यावेळी घेतली जात आहे. सुनावणी अगोदर सर्व तपासी अधिकाऱ्यांशी उज्वल निकम यांची चर्चा होत असल्याचे सांगितलं जातंय. नुकतेच बसवराज तेली, एसआयटीचे प्रमुख ही उज्वल निकम यांच्या भेटीला पोहचले आहेत.
प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्ही मागणार आहोत- धनंजय देशमुख
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाविषयी बोलले आहेत. यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. गरज पडल्यास आणखी आंदोलन आम्ही करणार, आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. गावकरी कुठेच मागे सरकले नाहीत. आज सविस्तर बोलणे झाले तर आम्ही याबाबत वकील साहेबांना बोलणार आहोत किंवा दोन दिवसांनी त्यांची आमची भेट होणार आहे. फास्टट्रॅकवर प्रकरण चालवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. या प्रकरणातले निघालेले सीडीआर आम्ही मागणार आहोत, यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचे फोन कॉल त्यांच्या अज्ञानात झाले आहेत. अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केली आहे.
बीड न्यायालयात आज काय होणार?
1) सरकारी वकील उज्वल निकष आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर होणार
2)आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेले कागदपत्रे आणि साहित्य पुरवली जाणार
3)आरोपींचे जबाब आज आरोपींच्या वकिलांना देणार
4)इलेक्ट्रॉनिक साहित्य ऑडिओ रेकॉर्ड, व्हिडीओ फोटो वकिलांना देणार
5)सिडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देणार
6)कबुली जबाब असतील तर तेही आरोपींच्या वकिलांना दिले जाणार
7) विष्णू चाटे याच्या कार्यालयात मिटिंग झालेले व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड्स आरोपींच्या वकिलांना दिले जाणार
8) आरोपींना वीसी द्वारे हजर केले जाणार
इतर महत्वाच्या बातम्या

























