(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Mega Auction 2025 : टीम इंडियातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारसाठी RCB ने तिजोरी उघडली! खेळला 10 कोटी 75 लांखाचा सट्टा
IPL mega auction 2025 RCB : आयपीएल 2025 मेगा लिलावात भुवनेश्वर कुमारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
IPL Mega Auction 2025 Bhuvneshwar Kumar RCB : आयपीएल 2025 मेगा लिलावात भुवनेश्वर कुमारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात भुवीसाठी चुरशीचे लढत सुरू होती, पण शेवटी आरसीबीने उडी मारली आणि संघात घेतले. भुवी 10 वर्षांनंतर दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातून मुक्त करून सर्वांना आश्चर्यचकित केले, कारण भुवी 2014 पासून हैदराबाद संघासोबत होता आणि तो संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज देखील होता. असे मानले जात होते की SRH लिलावात त्याच्यावर RTM वापरू शकते, परंतु तसे झाले नाही. भुवनेश्वर कुमार आता पुढील हंगामात विराट कोहलीसोबत आरसीबीसाठी खळबळ माजवताना दिसणार आहे.
*10.75CR, we got too excited! 🙈
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 25, 2024
भुवनेश्वर कुमारचा आयपीएल रेकॉर्ड
भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये आतापर्यंत 176 सामन्यात 181 बळी घेतले आहेत. भुवीने 650 षटके टाकली असून तो सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात 1670 डॉट बॉल टाकले आहेत. या वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये दोनदा 4 विकेट्स आणि दोनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय, आयपीएलच्या इतिहासात सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आता भुवी आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
कॅप्ड फास्ट बॉलर सेट
तुषार देशपांडे मूळ किंमत एक कोटी रुपये घेऊन मैदानात उतरला होता. त्यांच्यासाठी राजस्थान आणि सीएसके यांच्यात चांगली स्पर्धा रंगली होती. अखेर राजस्थानने तुषारला 6.50 कोटींना खरेदी केले. तर पंजाब किंग्जने मुकेश कुमारसाठी 6.50 कोटींची बोली लावली. दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा वापर केला आणि पंजाबने मुकेशसाठी 8 कोटी रुपयांची अंतिम बोली प्रस्तावित केली, जी दिल्लीने स्वीकारली. अशाप्रकारे दिल्लीने मुकेशला RTM द्वारे 8 कोटी रुपयांना विकत घेतले. मुकेशची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
दुसरीकडे, दीपक चहरसाठी मुंबई इंडियन्सने 9.25 कोटींची बोली लावली. चेन्नईने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. भारताचा अजून एक वेगवान गोलंदाज आकाश दीपसाठी लखनऊने 8 कोटींची बोली लावली. आरसीबीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. आकाशची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.