IPL 2025 CSK : चेन्नई सुपर किंग्जसाठी प्लेइंग-11 निवडणं ठरणार डोकेदुखी, स्टार खेळाडूला मिळणार नाही जागा; पाहा चॅम्पियन संघाची लिस्ट
Chennai Super Kings : सर्वात मोठ्या लीगसाठी 577 खेळाडूंची नावे निवडण्यात आली होती, त्यापैकी केवळ 182 खेळाडूंनाच खरेदी करण्यात आले.
Chennai Super Kings Full list of Players After IPL Auction 2025 : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडला. या जगातील सर्वात मोठ्या लीगसाठी 577 खेळाडूंची नावे निवडण्यात आली होती, त्यापैकी केवळ 182 खेळाडूंनाच खरेदी करण्यात आले. एवढेच नाही तर या लिलावात सर्वाधिक 25 खेळाडूंचा संघ पूर्ण करणारा चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला. चेन्नई संघाने लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवले होते. तर संघाने लिलावात 20 खेळाडूंना खरेदी केले.
मेगा लिलावात संघाने मुख्यतः जुन्या खेळाडूंवर जास्त विश्वास व्यक्त केला. त्यामुळे बऱ्यापैकी संतुलित असल्याचे दिसत आहे. आता हे पाहता लीगदरम्यान प्लेइंग 11 निवडणे ही संघासाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे. कारण तुम्ही फक्त चार परदेशी खेळाडू खेळू शकता. संघात अनुभवी भारतीय खेळाडूही आहेत. अशा परिस्थितीत एक नव्हे तर अनेक स्टार खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये सहजासहजी स्थान मिळू शकत नाही.
UNGAL ANBUDEN,
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 25, 2024
The Pride of '25! 🦁#WhistlePodu #Yellove #SuperAuction🦁💛 pic.twitter.com/AXDgGyWdrB
चेन्नई सुपर किंग्ज संघाने डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या दोघांना खरेदी केले आहे. याशिवाय राहुल त्रिपाठीही आता या संघाचा भाग झाला आहे. इतकंच नाही तर मधली फळी मजबूत करण्यासाठी दीपक हूडालाही संघाने विकत घेतलं आहे. शिवम दुबे आधीच संघाचा एक भाग होता. त्यात स्वतः रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी आहे. अशा स्थितीत कॉम्बिनेशन बनवणे कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी डोकेदुखी ठरू शकते. प्लेइंग 11 नुसार रचिन रवींद्र आणि दीपक हुडा यांना बाहेर राहावे लागेल.
असे असू शकते CSK ची प्लेइंग-11 : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, नूर अहमद, मथिसा पाथिराना, खलील अहमद.
इम्पॅक्ट प्लेअर : अंशुल कंबोज/विजय शंकर/दीपक हुड्डा
चॅम्पियन CSK संघाची 25 खेळाडूंची लिस्ट -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथिशा पाथीराना, एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, राहुल त्रिपाठी, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम कुरन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हूडा, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.