एक्स्प्लोर

IPL 2022 Final GT vs RR : गुजरातचं 'हार्दिक'अभिनंदन, पदार्पणातच चॅम्पियन, राजस्थानला मात देत कोरलं ट्रॉफीवर नाव

IPL 2022 Final : आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी निवडली, पण त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी खास ठरला नाही केवळ 130 धावाच त्यांना करता आल्या, ज्या गुजरातनं सहज करत सामन्यासह स्पर्धाही जिंकली आहे.

RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना सात विकेट्सनी जिंकत गुजरातनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला मात दिल्यामुळे 14 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचं राजस्थानचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवल्य़ा गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 9 गडी गमावत 130 धावाच केल्या. ज्या 18.1 षटकातच गुजरातने पूर्ण करत सामन्यासह स्पर्धाही जिंकली. गुजरातकडून शुभमनने सर्वाधिक नाबाद 45 धावांची तुफान खेळी केली.

नाणेफेक जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एक मोठी धावसंख्या करुन गुजरातवर दबाव टाकण्याचा निर्धार राजस्थानने केला असावा, पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा हा निर्णय़ पुरता फसला. संघाची ठिक-ठाक झालेली सुरुवात नंतर मात्र संपूर्णपणे ढासळली. सलामीवीर यशस्वी आणि बटलर क्रिजवर असताना एक मोठी धावसंख्या होईल असं वाटतं होतं. यशस्वी फटकेबाजी देखील करत होता. पण 22 धावा करुन तो बाद झाल्यानंतर मात्र राजस्थानचा डाव धीमा झाला. यशने ही विकेट घेतली होती. त्यानंतर कर्णधार संजू बटलर सोबत डाव सांभाळत असतानाच गुजरातचा कर्णधार हार्दिकने संजूला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पडिक्कलही बाद झाला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या. हिटमायर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 11 तर रियानने 15 धावांची खेळी केली. संपूर्ण संघ मिळून केवळ 130 धावाच करु शकला.

शुभमनची संयमी खेळी आणि गुजरात विजयी

131 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. साह स्वस्तात माघारी परतला. नंतर वेडही 8 धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर हार्दिकने शुभमनसह डाव सावरला आणि तुफान खेळी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. 30 चेंडूत 34 धावा करत हार्दिकने संघाला विजयाजवळ नेलं, हार्दिक बाद होताच मिलरने 32 धावांची तुफान खेळी करत विजय पक्का केला. पण शुभमनने अखेरेच्या चेंडूवर षटकार ठोकत विजयश्री संघाला मिळवून दिला. त्याच्या नाबाद 45 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.

हार्दिक सामनावीर

सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्याने फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या.  ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget