एक्स्प्लोर

IPL 2022 Final LIVE Blog : गुजरातनं जिंकली आयपीएल 2022, 7 विकेट्सनं मिळवला विजय

IPL 2022 Final GT vs RR LIVE Updates:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहे. 

Key Events
IPL 2022 Final GT vs RR LIVE Updates Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Score IPL 2022 Champions Winner Prize Money BCCI IPL Marathi news IPL 2022 Final LIVE Blog : गुजरातनं जिंकली आयपीएल 2022, 7 विकेट्सनं मिळवला विजय
GT Vs RR IPL 2022 Final LIVE

Background

IPL 2022 Final GT vs RR LIVE : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जात आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार असून यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?' यापैकी नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता जगभरातल्या तमाम आयपीएलचाहत्यांना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची मेगा फायनल आणि या मेगा फायनलमध्ये हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. 

गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय.

इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल १४ वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.

अशी आहे अंतिम 11

गुजरात - शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्यूसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल. 

राजस्थान -जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मकॉय, युझवेंद्र चहल.

हे देखील वाचा- 

00:03 AM (IST)  •  30 May 2022

IPL 2022 Final Live Updates : हार्दिक सामनावीर

सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्याने फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या.  ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

23:41 PM (IST)  •  29 May 2022

IPL 2022 Final Live Updates : शुभमनचा विजयी षटकार, गुजरातचा 7 विकेट्सने विजय

राजस्थानच्या 131 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत 18.1 षटकात 7 गडी राखून विजय मिळवला आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Embed widget