IPL 2022 Final : रियान परागने तोडला पोलार्डचा 'तो' रेकॉर्ड, अंतिम सामन्यात केली कमाल
Riyan Parag Record : रियान परागने गुजरात टायटन्सविरुद्ध फायनलच्या सामन्यात एक खास रेकॉर्ड नावे केला आहे.
![IPL 2022 Final : रियान परागने तोडला पोलार्डचा 'तो' रेकॉर्ड, अंतिम सामन्यात केली कमाल Riyan Parag took 17 catches in ipl 2022 breaks pollards record of 15 catches IPL 2022 Final : रियान परागने तोडला पोलार्डचा 'तो' रेकॉर्ड, अंतिम सामन्यात केली कमाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/26728b263f4766e9532bdfc7a45a35fb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Riyan Parag Record in GT vs RR : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यातील अंतिम सामन्यात रियान परागने एका नव्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) हंगामात त्याने तब्बल 17 झेल पूर्ण केले असून आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पोलार्डला मागे टाकलं आहे. पोलार्डने (Pollard) 20147 साली 15 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलीयर्स (AB) नंबर 1 आहे. त्याने 2016 साली 19 झेल घेतले होते. यानंतर ड्वेन ब्राव्हो आणि डेविड मिलर 14 झेलांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. ब्राव्होने 2013 मध्ये तर मिलरने 2014 मध्ये ही कामगिरी केली होती.
रियानच्या यंदाच्या हंगामातील खेळीचा विचार करता आयपीएल 2022 मध्ये त्याने खास कामगिरी केलेली नाही. 17 सामने खेळले असून यामध्ये त्याने केवळ 183 रनच केले आहेत. यावेळी त्याने केवळ एक अर्धशतक ठोकलं आहे. तर गोलंदाजीचा विचार करता, त्याने 24 चेंडूत फेकत 59 रन दिले असून एक विकेट घेतली आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक
- 19 झेल एबी डिविलियर्स (2016)
- 17 झेल रियान पराग (2022)*
- 15 झेल के पोलार्ड (2017)
- 14 झेल डी ब्रावो (2013)/डी मिलर (2014)
हे देखील वाचा-
- Lockie Ferguson Ipl Record : वेगवान लॉकी! गुजरातच्या फर्ग्यूसनने 157.3 Kmph वेगाचा चेंडू फेकत आयपीएल रेकॉर्डशी केली बरोबरी
- GT vs RR, Toss Update : महामुकाबल्यात राजस्थानने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, मोठी धावसंख्या करण्याचा निर्धार, पाहा दोघांची अंतिम 11
- IPL 2022 Final : वंदे मातरम्! अंगावर शहारा आणणारा एआर रहमानचा परफॉर्मन्स, पाहा VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)