(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lionel Messi Retirement: मेस्सीनं निवृत्तीचा निर्णय बदलला; आता तर म्हणतोय...
Lionel Messi Retirement: मेस्सीनं कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्तीचे संकेत दिले होते.
Lionel Messi Retirement: फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर बॅलोन डी'ओर विजेता लिओनेल मेस्सीनं (Lionel Messi) निवृत्तीचा निर्णय बदलला. जगज्जेता म्हणून अजून मला काही सामने खेळायचे आहेत, असं मेस्सीनं म्हटलंय. मेस्सीनं कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्तीचे संकेत दिले होते. कतारमध्ये रंगणारा फुटबॉल विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल, असं त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं.
रविवारी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळविल्यानंतर मेस्सी म्हणाला, "मला ही ट्रॉफी अर्जेंटिनाला घेऊन जायची आहे आणि इतर सर्वांसोबत त्याचा आनंद लुटायचा आहे." मेस्सीला पुढील काही सामने वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहेत, असंही त्यानं म्हटलंय.
ट्वीट-
World Champions 🏆🇦🇷#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/TGLbXxRFLc
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
ट्वीट-
Lionel Messi: The first player ever to win two adidas Golden Balls!#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
36 वर्षानंतर अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकला
कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाच्या संघानं फुटबॉल विश्वचषक जिंकला. फ्रान्सचा स्टार खेळाडू एमबाप्पेनं या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक साधली असली. पण संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.
मेस्सीची ऐतिहासिक कामगिरी
अर्जेंटिनाच्या विजयासह मेस्सीनं अंतिम फेरीत इतिहास रचला. त्यानं दोनदा गोल्डन बॉल जिंकण्याचा मान मिळवला आहे. वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी दोनदा गोल्डन बॉल जिंकणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरलाय. यापूर्वी 2014 मध्ये जर्मनीकडून हरल्यानंतरही त्या विश्वचषकात लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल देण्यात आला होता.
हे देखील वाचा-