Wimbledon 2022 Womens Final : विम्बल्डन स्पर्धेत महिला गटात एलेना रिबाकिना विजयी, पहिल्यांदाच कझाकिस्तानच्या खेळाडूने जिंकला खिताब
Wimbledon 2022 : कझाकिस्तानची महिला टेनिसपटू एलेना रिबाकिना ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर हिला मात देत विम्बल्डन स्पर्धेवर नाव कोरलं आहे.
Elena Rybakina Won Wimbledon 2022 : टेनिस जगतातील (Tennis) मानाची स्पर्धा असणारी विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये (Wimbledon 2022) महिला गटात कझाकिस्तानच्या (kazakhstan) एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरला (Ons Jabeur) मात देत विजय मिळवला आहे.
The touch of a champion 🤌
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2022
Elena Rybakina's cute winner is our Play of the Day#Wimbledon | @HSBC_Sport pic.twitter.com/Gz4pEaROD6
चुरशीच्या झालेल्या सामन्यात एलेनाने (Elena Rybakina) ओन्स जेबुरला 3-6, 6-2 आणि 6-2 अशा तीन सेट्समध्ये पराभूत करत विम्बल्डन महिला एकेरीचे (wimbledon 2022 Women singles) विजेतेपद पटकावले आहे. 23 वर्षाच्या वयात एलेनाने हा खिताब पटकावल्यामुळे संपूर्ण टेनिस जगतात तिचे कौतुक होत आहे.विशेष म्हणजे कझाकिस्तानकडून हा खिताब पहिल्यांदाच कोणत्यातरी खेळाडूने मिळवला आहे.
ओन्स इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा
या अत्यंत मोठ्या विजयानंतर एलेनाचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना एलेना म्हणाली,“मी सध्या नि:शब्द आहे. मी यावेळी प्रतिस्पर्धी ओन्सचे अभिनंदन करू इच्छिते. ती इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. तिच्याविरुद्ध खेळणे खूप अविश्वसनीय आणि आनंदी होते. यावेळी प्रेक्षकांची गर्दीही अद्भुत होती. मी हा खिताब पटकावेल अशी अपेक्षा नव्हती पण या विजयानंतर मी सर्वांचे आभार मानू इच्छिते.''
हे देखील वाचा-
- Wimbledon 2022 Final: नोवाक जोकोविचला रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी !
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
- IND vs ENG 2nd T20 : भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी दमदार विजय, मालिकाही घातली खिशात, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर