एक्स्प्लोर
Advertisement
IND vs ENG 2nd T20 : भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी दमदार विजय, मालिकाही घातली खिशात, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs ENG Live : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना भारताने 49 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG,2nd T20 : भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्या होमग्राऊंडमध्ये सलग दुसऱ्या टी20 सामन्यात मात देत तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, चहलने उत्तम गोलंदाजी केली. या विजयामुळे भारताने तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावूनही सामना जिंकला. यावेळी भारताची भेदक गोलंदाजी यासाठी कारणीभूत ठरली. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ज्यानंतर भारताने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले. जे पूर्ण करताना 121 धावांवर इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला आणि सामना भारताने 49 धावांनी जिंकला.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताकडून आधी दमदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलं. विशेष म्हणजे भारतीय गोलंदाजांनी आज एका उत्कृष्ट खेळीचं दर्शन घडवलं.
- नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या इंग्लंडविरुद्ध भारताने चांगली सलामी दिली.
- भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडीने तुफान फटकेबाजी केली. दोघांनीही दमदार खेळीला सुरुवात केली. पण इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर तंबूत धाडलं. ज्यानंतर पंत (26) आणि कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच माघारी धाडलं.
- ज्यानंतर भारतीय फलंदाज एका मागे एक बाद होऊ लागले. पण रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत 29 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले.
- इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या.
- 171 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर भुवनेश्वरने जेसन रॉयला तंबूत धाडलं. मग एका मागे एक इंग्लंडचे गडी बाद होतच होते. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेविड विलीने 33 ही सर्वाधिक धावसंख्या केली. इतर खेळाडू खास कामगिरी करुच शकले नाहीत.
- भुवनेश्वरने सर्वाधिक 3 गडी यावेळी बाद केले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर पांड्या आणि पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा एक गडी धावचीत झाला.
- 3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद करणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
- हा सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 2nd T20, Match Highlights : भारताची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी, 49 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी
- Bakri Eid 2022 : भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली बकरी ईद, सिराज, आवेशसह उमरानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement