World Cup : किक्रेटपटूंच्या हेल्मेट आणि ग्लोव्हजची किंमत माहितीय? सामान्य माणसाचा महिन्याचा पगारही पडेल कमी
Cricket Kit Cost : भारताकडून खेळणारे क्रिकेटपटू लेदर बॉलने खेळतात आणि त्यामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचाही धोका असतो. अपघात टाळण्यासाठी आयसीसीने नियम बनवले आहेत.
Cricketers Helmets and Gloves Cost : यंदा क्रिकेट विश्वचषक (ODI World Cup 2023) भारतात होत असल्याने चाहत्यांची क्रिकेटबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटबाबत रंजक माहिती देणार आहोत. क्रिकेटपटू मैदानात उतरताना हेल्मेट आणि ग्लोव्हज घालून उतरतात. पण, यांची किंमत तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
किक्रेटर्सच्या हेल्मेट आणि ग्लोव्हजची किंमत किती?
भारतात क्रिकेट खेळणाऱ्यांची कमतरता नाही. तुम्ही तुमच्या शहरात किंवा गावातील कोणत्याही मैदानात गेलात तर तुम्हाला तिथे नक्कीच काही मुलं क्रिकेट खेळताना दिसतील. अगदी अरुंद रस्ता किंवा गल्लीमध्येही मुलं क्रिकेट खेळताना दिसतात. पण, व्यावसायिक क्रिकेटमध्ये लेदर बॉल, बॅट आणि सुरक्षित उपकरणे (Safety Gears) सह खेळतात.
क्रिकेट खेळताना गंभीर दुखापतीचाही धोका
गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस बॉल किंवा कॅनव्हासचा चेंडू असल्यामुळे दुखापतीचा फारसा धोका नसतो. पण भारताकडून खेळणारे क्रिकेटपटू लेदर बॉलने खेळतात आणि त्यामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचाही धोका असतो.
क्रिकेटपटूंच्या हेल्मेटची किंमत किती?
क्रिकेट खेळताना असे अनेक अपघात घडले आहेत ज्यामध्ये चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडूचा मृत्यू झाला आहे. यामुळेच हे अपघात टाळण्यासाठी आयसीसीने नियमही बनवले आहेत. व्यावसायिक क्रिकेटपटूंनी घातलेल्या हेल्मेटची किंमत 2000 ते 20000 रुपये किंवा त्याहूनही अधिक असू शकते. हेल्मेटची किंमत ब्रँड आणि गुणवत्तेवर अवलंबून असते.
ग्लोव्हजची किंमत किती?
क्रिकेटपटूंचे ग्लोव्हजही बरेच महाग असतात. व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या ग्लोव्हजची किंमत 2000 रुपयांपासून सुरू होते आणि 10000 रुपयांपर्यंत असू शकते. अनेक वेळा गोव्हजची किंमत 20,000 रुपयांपेक्षाही जास्त असते. ग्लोव्हजची किंमतही ब्रँड आणि गुणवत्तेवर अवलंबून असते.ग्लोव्हज अधिक चांगल्या लेदर आणि मटेरियलचे बनवलेले असतील तर त्याची किंमत आणखी जास्त असते.
आयसीसीचे नियम कोणते?
क्रिकेट खेळताना चेंडू डोक्याला लागल्याने फलंदाजाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच हे अपघात टाळण्यासाठी आयसीसीने क्रिकेटपटूंसाठी नियम बनवले आहेत. या नियमांतर्गत क्रिकेटपटूंसाठी कोणतेही हेल्मेट बनवताना ते नवीन ब्रिटीश मानक BS7928:2013 नुसार असणं आवश्यक आहे. हा नियम 1 फेब्रुवारी 2017 पासून लागू करण्यात आला आहे.