Video : आरसीबीच्या दणक्यानं भावड्याचा चेहरा 'पिवळ्या'चा काळा झाला, त्याचीच पिवळी शिट्टी खेचून वाजवली, जखमेवर मीठ चोळलं!
CSK vs RCB : आरसीबीने चेन्नईचा पराभव केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केलंय.

CSK vs RCB : आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि.28) महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) संघ आमने-सामने आला होता. या सामन्यात विराटच्या आरसीबीने चेन्नईवर दणदणीत विजय मिळवलाय. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळण्यात आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर 196 धावांचा डोंगर उभारला. दरम्यान, आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 146 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईला तब्बल 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय.
Man, this is BRUTAL 😂🤣🤣🤣#RCB #IPL2025 #PlayBold pic.twitter.com/RJ22OqdbSI
— ᴅᴋ (@coach_dk19) March 29, 2025
चेन्नई समर्थक मित्राच्या गळ्यातील शिट्टी वाजवून जखमेवर मीठ चोळलं
दरम्यान, चेन्नईचा पराभव झाल्यानंतर आरसीबीच्या समर्थकांनी जोरदार सेलीब्रेशन केलंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये चेन्नई समर्थक मित्र आणि आरसीबी समर्थक मैत्रीण शेजारी-शेजारी बसले आहेत. चेन्नई पराभवाच्या छायेत आल्यानंतर या मैत्रीणीने चेन्नई समर्थक मित्राच्या गळ्यातील शिट्टी वाजवून त्याच्या जखमेवर मीठ चोळलंय. आरसीबीच्या दणक्यानं भावड्याचा चेहरा 'पिवळ्या'चा काळा झाला, वरून त्याचीच पिवळी शिट्टी खेचून वाजवत जखमेवर सपशेल मीठ चोळलं!
आरसीबीच्या विजयानंतर कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा आनंद गगनात मावेना
भारतातून पळ काढून गेलेला कर्जबुडव्या विजय मल्ल्याने देखील आरसीबीच्या या विजयानंतर सेलिब्रेश केलंय. 18 वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर दक्षिणेकडील प्रतिस्पर्धी सीएसकेवर दमदार विजय मिळवल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन. फलंदाजी आणि गोलंदाजीसह उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. त्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचं ट्वीट विजय मल्ल्या याने केलं आहे.
Congratulations to RCB for an emphatic victory over Southern rivals CSK in their Chepauk fortress after 18 long years. A great all round performance with bat and ball. Play Bold guys.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 28, 2025
चेन्नईचे आयपीएलमधील सर्वात मोठे पराभव
60 धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे - 2013
54 धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, ब्रेबॉर्न - 2022
50 धावा विरुद्ध आरसीबी, चेन्नई - 2025
46 धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई - 2019
44 धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, कटक - 2014
44 धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई - 2020
Man, this is BRUTAL 😂🤣🤣🤣#RCB #IPL2025 #PlayBold pic.twitter.com/RJ22OqdbSI
— ᴅᴋ (@coach_dk19) March 29, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या




















