फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट, सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड विजेती; इशान किशनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Ishan kishan girlfriend aditi hundia : शतक झळकावणाऱ्या इशान किशनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

Ishan kishan girlfriend aditi hundia : भारताचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या इशानने आयपीएलमध्ये रविवारी (दि.24) राजस्थान रॉयल्स विरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. त्याने 45 चेंडूमध्ये शतकी खेळी करत सनरायजर्स हैद्राबादला मोठा विजय मिळवून दिला. इशानने किशन 47 चेंडूमध्ये 106 धावा करत नाबाद राहिला. या सामन्यात इशानने 11 चौकार, 6 षटकार लगावले.
इशान किशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
इशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने (SRH) 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने धावांचा डोंगर उभारल्यानंतर राजस्थानपुढे मोठं आव्हान होतं. हैद्राबादचं आव्हान राजस्थानला पेलता आलं नाही. हैद्राबादने राजस्थान रॉयल्सचा (RR) 44 धावांनी पराभव केला.
View this post on Instagram
दरम्यान आता इशान किशनसोबत त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाचीही सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झालीये. इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया एक मॉडेल आहे आणि ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आदिती हुंडियाचे इंस्टाग्रामवर 287K फॉलोअर्स आहेत. याशिवाय आदिती हुंडिया तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंतून आदितीच्या ग्लॅमरसपणा दिसून येतोय.
इशान किशनचे मॉडेल आदिती हुंडियासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदिती हुंडिया ही इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आदिती हुंडियाचे इशान किशनसोबतचे फोटो काही वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवशी व्हायरल झाले होते. अदिती हुंडिया देखील काही आयपीएल सामन्यांमध्ये इशान किशनला सपोर्ट करताना दिसली आहे. अदिती हुंडियाच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे तर, ती मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई करते.
View this post on Instagram
आदिती हुंडियाने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले. इशान किशनने आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलेले नाही, परंतु स्टेडियममधील भारतीय क्रिकेटपटूच्या कामगिरीबद्दल आदिती हुंडियाने केलेल्या पोस्टने त्यांचे काहीतरी नाते असल्याचे स्पष्ट केले आहे. इशान किशनला जेव्हा 2021 मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली तेव्हा आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप समारंभाचा व्हिडिओ शेअर केला. अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे आणि तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
