(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : जेव्हा खराब फॉर्ममध्ये होतो, तेव्हा अनुष्का आणि चाहत्यांवरही संताप... ; कोहलीने व्यक्त केल्या भावना
Virat Kohli : भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली 2020 चे 2022 दरम्यान वाईट फॉर्ममध्ये होता. यावेळी त्याचावर काय परिणाम झाला यावर कोहलीने मौन सोडले आहे.
Virat Kohli On Anushka Sharma : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) माजी कप्तान विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा त्याच्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांते विराटने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यान तुफान खेळी केली. त्याच्या शतकी खेळीचा भारतीय संघाला (Team India) मोठा फायदा झाला. दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा कोहली त्याच्या वाईट फॉर्ममध्ये होता. 2020 ते 2022 या दीड वर्षाच्या काळात विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होता. यावेळी त्याच्या मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही परिणाम झाला होता. कोहली खराब फॉर्ममध्ये असताना त्याच्यावर काय परिणाम झाला, याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. कोहलीने सांगितलं की, यावेळी तो अनुष्का आणि चाहत्यांसोबतही चुकीचं वागला होता.
खराब फॉर्ममध्ये असताना कोहली झाला होता चिडखोर
विराट कोहलीने सांगितले की, खराब फॉर्ममध्ये असताना तो खूप चिडखोर झाला होता, त्याला स्वतःचा राग येऊ लागला होता. या गोष्टीचा परिणाम त्याचे कुटुंब, पत्नी अनुष्का, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींवरही होत होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवशी बोलताना विराट कोहलीने याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या. विराट म्हणाला की, त्या वाईट काळात त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. माझ्या चिडचिडपणामुळे पत्नी अनुष्का शर्मासह अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले.
पाहा व्हिडीओ :
Of mutual admiration 🤝, dealing with expectations & starting the year with a glorious 💯
— BCCI (@BCCI) January 11, 2023
A conversation that will brighten up your Wednesday morning as @surya_14kumar chats with centurion @imVkohli 😃- By @ameyatilak
Full interview 🔽 #TeamIndia #INDvSLhttps://t.co/VVfjt19zRM pic.twitter.com/StExnar1V1
कोहलीला आठवला त्याचा वाईट काळ
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत संवाद साधताना विराट कोहली म्हणाला की, 'जेव्हा थोडी वाईट वेळ येते तेव्हा माझ्या बाबतीत निराशाच जास्त होते. लोकांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? मला कसे खेळायचे होते. मी असा खेळतो, मला असे खेळावे लागेल, पण क्रिकेट मला संधी देत नव्हते. त्यावेळीचा काळ माझ्यासाठी वेगळाच होता.'
सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारा क्रिकेटपटू
भारतीय स्टार क्रिकेटपटू जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 230 दशलक्ष (230 Million) फॉलोअर्स आहेत. कोहली सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारा क्रिकेटपटू आहे. कोहली इंस्टाग्राम कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो 529 दशलक्ष (529 Million) इंस्टाग्राम फॉलोअर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लिओनेल मेस्सीचे इंस्टाग्रामवर 415 दशलक्ष (415 Million) फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या