पुन्हा मैदानात दिसणार दादाची दहशत, वर्ल्ड लीजेंड्सविरुद्ध संभाळणार इंडिया महाराजा संघाची धुरा
Sourav Ganguly will lead India Maharajas in Legends League Cricket: लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
Sourav Ganguly will lead India Maharajas in Legends League Cricket: लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात दिग्गज क्रिकेटपटू आमने- सामने येतील. भारतीय चाहत्यांसाठी लीजेंड्स लीगचा पहिला सामना खूप खास असणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना भारतातील ऐतिहासिक स्टेडियम कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, इंडिया महाराजा संघाचं नेतृत्व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली करणार आहे. यावर्षी भारतीय संघाचं नाव इंडिया महाराज ठेवण्यात आलंय. तर, वर्ल्ड संघाचं नाव वर्ल्ड जाएंट्स असं आहे.
सौरव गांगुली दिर्घकाळानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये वर्ल्ड टीमकडून 10 देशातील खेळाडू सहभागी होणार आहे. ज्यात इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या समावेश आहे.
सौरव गांगुली कारकीर्द
सौरव गांगुलीनं 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. सौरव गांगुलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार 212 धावा केल्या आहेत. ज्यात एका दुहेरी शतकासह एकूण 16 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीनं 11 हजार 363 धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीनं एकदिवसीय क्रिकेटमधील 183 धावा सर्वोत्तम धावसंख्या आहे. ज्यात 22 शतक आणि 72 अर्धशतकांची नोंद आहे. आयपीएलमध्ये सौरव गांगुलींनी कोलकाता नाईट रायडर्सचंही नेतृत्व केलंय. तसेच पुणे वॉरियस संघाचं प्रतिनिधित्वही केलंय.
इंडिया महाराजा संघ:
सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद केफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा, रतिंधर सिंह सोढी.
वर्ल्ड लीजेंड्स:
इयॉन मॉर्गन (कर्णधार), लेन्डले सिमन्स, हर्शल गिब्स, जॅक कालिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नाथन मैक्कलम, जोंटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकदजा, मशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन.
हे देखील वाचा-